रन फॉर राईड सायकल राईड मध्ये सहभागी झालेल्या अष्टदुर्गा |
नारायणगाव : “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अश्या जयघोषात नारायणगावच्या ८ मुलींनी नारायणगाव, ओझर, ओतूर, बनकर फाटा, गोळेगाव, जुन्नर मार्गे पुन्हा नारायणगाव अशी ५० किलोमीटरची रन फॉर राईड सायकल राईड यशस्वी केली.
यामध्ये शिल्पा गायकवाड, श्रावणी गायकवाड, स्मिता शिंदे, श्रावणी शिंदे,सविता कुळेकर,उन्नती कुळेकर, आदिती नलावडे, दीपाली दरंदाळे, या मुलींनी सहभाग घेतला. राईडची सुरुवात रविवारी (दि.१३) सकाळी नारायणगाव येथील शिवकालीन वेशीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून करण्यात आली.
माजी आमदार शरद सोनवणे यांचा आमरण उपोषणाचा इशारा
ग्रीन फिट स्पोर्ट राष्ट्रीय संस्था रन, राईड, वॉक या स्पोर्ट ॲक्टिव्हिटीला प्रोत्साहन व प्रसार करणारी संस्था आहे. रन फॉर राईड सायकल राईड मध्ये ४ महिला व ४ मुलींनी सहभाग घेतला असून संस्थेच्या वतीने वर्षभर उपक्रम राबवले जातात.
यामधूनच महाराष्ट्रात राजे छत्रपती रन, राईड, विजय दिन रन राईड, इंडिपेंडंट डे रन राईड, हार्ट टू हार्ट रन राईड, कॅन्सर जनजागृती रन राईड, अशा विविध नावाने विशेष दिवसांची आठवण ठेवून खेळ व स्पर्धांचे आयोजन केले जाते. स्पर्धकांना आळंदी येथील सायकल प्रेमी डॉ.सचिन बाविस्कर यांच्या हस्ते मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
खुशखबर ! कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर
आजचे निमगिरी, बल्लाळवाडी, जुन्नर शहराचे तापमान पहा एका क्लिकवर !