Thursday, April 25, 2024
Homeग्रामीणपुणे : बाळ हिरडा खरेदी व पेसा क्षेत्रात आदिवासी गावाचा समावेश करा...

पुणे : बाळ हिरडा खरेदी व पेसा क्षेत्रात आदिवासी गावाचा समावेश करा – ट्रायबल फोरम ची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी

मंचर : बाळ हिरडा खरेदी आदिवासी महामंडळाच्या वतीने करु आदिवासींवरील अन्याय दूर करावा अशी मागणी ट्रायबल फोरम च्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आदिवासी भागातील बाळ हिरडा ही औषधी वनस्पती असलेले फळ आज पर्यंत आदिवासी महामंडळ खरेदी करत होते. मात्र चार वर्षे झाली खरेदी बंद आहे. 

हेही वाचा ! जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आणि जुन्या बसस्थानकाची आमदार बेनके यांच्याकडून पाहणी !

तसेच यावेळी खेड व मावळ हे दोन तालुके पेसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी आपल्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारची शिफारस राज्यपालांना करावी अशीही मागणी करण्यात आली. 

मावळ तालुका व खेड तालुका हे दोन तालुक्यांमध्ये अनेक आदिवासी गावांमध्ये लोक संख्या मोठ्या प्रमाणात आदिवासी असून सुद्धा ही गावे भौगोलिक दृष्ट्या आदिवासी दाखवली गेली नाहीत त्याचा फटका आदिवासी बांधवांना आज बसत आहे. अनेक आदिवासी ग्रामपंचायती या भागात असून त्यांना पेसा क्षेत्राचा निधी उपलब्ध होत नाही. 

हेही वाचा ! जुन्नर : स्वातंत्र्यानंतर प्रथमच लालपरी जांभूळशीमध्ये दाखल

पेसा क्षेत्र घोषित झाल्याशिवाय तेथे पेसा निधी उपलब्ध होणार नाही म्हणून लवकरात लवकर आपल्या माध्यमातून पेसा क्षेत्र या विषयाला न्याय द्यावा व पुणे जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील आदिवासी जनतेला प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली. ट्रायबल फोरम च्या वतीने आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांची विधानभवनात भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. 

निवेदन देतेवेळी ट्रायबल फोरमचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, उपाध्यक्ष मारुती खामकर, पुणे जिल्हा अध्यक्ष रोहित सुपे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष विक्रम हेमाडे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रफुल कोवे हे उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय