पुणे – आपटे रोड शिवाजी नगर येथे उभारण्यात आलेल्या ॲाल्विन फिनसर्व प्रा लि. च्या नूतन कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. (Pune)
गेल्या १५ वर्षापासून मुच्यअल फंड गुंतवणूकीसाठी कार्यरत असलेल्या ॲाल्विन फिनानशिअल सर्विसेस् या भागीदारी संस्थचे रुपातंर ॲाल्विन फिनसर्व प्रा. लि या संस्थेत करण्यात आले आहे. हे रुपांतर होत असताना स्वतःच्या नविन वास्तूमधे नविन कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन व्हाईटओक मुच्यअल फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सोमय्या, यांच्या हस्ते फीत कापून तसेच दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
उद्घाटन करत असताना पेहलगाम मधे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भान ठेऊन, अतिरेकी हल्ल्याचा निषेध नोंदवत हल्ल्यामधे मृत पावलेल्या पर्यटकांच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली.
आशिष सोमय्या यांनी नविन कार्यालयाची प्रशंसा केली. ॲाल्विन फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेड च्या मालकी हक्क ते भागीदारी संस्था ते खाजगी मालकी संस्थेतील रुपांतराच्या १५ वर्षाच्या प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला. ॲाल्विन फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्रीयुष ओसवाल, सुशिल मोरे, अंकुर गांधी, योगेश भावे यांना उज्ज्वल भवितव्यसाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या व ५०० कोटींचा व्यवस्थापन अंतर्गत मालमत्तेचा टप्पा पार केल्याबद्दल अभिनंदन केले. (Pune)
मुच्यअल फंड क्षेत्रातील विविध दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली.
इंव्हेसको मुच्यअल फंडाचे देशातील किरकोळ व संस्थात्मक विक्रीप्रमुख रोहित गोयल, कॅनरा रोबेकोचे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्रीदत्त भांडवलदार यांनी नविन कार्यालयात येऊन ॲाल्विन संचालक मंडळाचा उत्साह वाढविला.
दोन दिवस चाललेल्या उद्घाटन च्या कार्यक्रमासाठी पहिल्या दिवशी पुण्यातील विविध मुच्यअल फंडातील कर्मचाऱ्यांनी तसेच व्यवसायातील प्रमुख वितरकांनी उपस्थित राहून आनंद द्विगुणित केला. दुसऱ्या दिवशी ॲाल्विनच्या विविध ठिकाणांहून आलेल्या गुंतवणूकदारांनी सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कार्यालयास भेट देऊन
ॲाल्विन फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक व कर्मचारी वर्गाचा उत्साह वाढविला. कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ॲाल्विन फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळाने गुंतवणूकदारांना योग्यप्रकारे सेवा देण्यासाठी व आर्थिक साक्षरता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले. (Pune)
अनेक गुंतवणूकदारांनी त्यांना आर्थिक साक्षरतेसाठी हमखास मदत करू असे आश्वासने दिली.
---Advertisement---
---Advertisement---
Pune : ऑल्विन फिनसर्व कार्यलायाचे उदघाटन
---Advertisement---
- Advertisement -