Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणपुणे : कुकडी प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस, वडज धरणातून पाणी सोडले

पुणे : कुकडी प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस, वडज धरणातून पाणी सोडले

संग्रहित छायाचित्र

जुन्नर (पुणे) : जुन्नर हा निसर्गरम्य तालुका आहे. या तालुक्यात कुकडी प्रकल्पातर्गत वडज, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, येडगाव धरणे आहेत. तीन जिल्ह्यातील शेतीला वरदान असलेल्या कुकडी प्रकल्पात या हंगामात नव्या पाच टीएमसी पाण्याची भर पडली आहे. कुकडीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्यात वाढ होत आहे. 

दरम्यान, डिंभे धरणातील पाण्याची पातळी निम्मी झाली असून, वडज धरणातून घोड धरणासाठी पाच हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

कुकडी’त पाच टीएमसी पाणी वाढले. पुणे, नगर व सोलापूरच्या सात तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या कुकडी प्रकल्पात नव्या पाण्याची चांगली आवक सुरू झाली आहे. कुकडीच्या डाव्या कालव्यासाठी उपयोगी असणाऱ्या येडगाव धरणात एक टीएमसी पाणीसाठा झाला आहे. डिंभे धरणही निम्मे भरले असल्याने आशादायक चित्र आहे. त्यातच वडजमधून घोड नदीत पाच हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने घोडच्या लाभधारकांनाही दिलासा मिळणार आहे.

कुकडी प्रकल्पात सध्या अकरा टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसाने धरणांची पाणीपातळीत वाढ होत असल्याची माहिती समजली.


संबंधित लेख

लोकप्रिय