Tuesday, January 21, 2025

पुणे : लढाऊ कामगार नेते कॉम्रेड दिलीप बाठे यांचे निधन

भोर (पुणे) : भोर तालुक्यातील केंजळ गावचे मुलुख मैदान तोफ आणि 1988 च्या टेल्को कामगार संघटनेचे लढाऊ कामगार नेते कॉम्रेड दिलीप बाठे यांचे पहाटे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. अत्यंत बुद्धिमान, हुशार, अचूक व मुद्देसूद बोलणं व राजन नायर पॅनलमध्ये धडाडीचे नेतृत्व करणाऱ्या या नेत्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय मोठा संघर्ष पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्ट्यात केला होता.

कामगारांचे संघटना, स्वातंत्र्य, व्यवस्थापनाने पोसलेले गुंडांचे साम्राज्य या ऐतिहासिक लढ्यात संपुष्टात आणले होते. 1989 च्या या लढ्यात व्यवस्थापनाने 189 कामगार नेते आणि कार्यकर्ते याना बडतर्फ केले होते. 

भोर तालुक्यातील अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते उत्कृष्ठ संघटक होते. रायरेश्वर दिंडीतून दरवर्षी ते पायी पंढरपूरला यात्रा करायचे. शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती, गुंजवणी प्रकल्प संघर्ष समिती, अमृता उद्योग समूह(भोर) आणि जिल्हा भूविकास बँक या संस्थांवर ते प्रमुख पदाधिकारी होते.

तालुक्यातील एक गेमचेंजर नेतृत्व हरपले आहे. एक उत्कृष्ट वक्ता आणि वारकरी आमच्यातून निघून गेला, अशी भावना भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी. व्यक्त केले.

दिलीप बाठे यांनी तरुण वयात टाटा कंपनीत उत्कृष्ट संघटना बांधली. 1980 ते 1990 या काळात पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रात श्रमिकांना कामगारांचे हक्क आणि अधिकार समजवून दिले. त्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष कसा करावा हे दिलीप बाठे यांनी शिकवले. त्यांच्या निधनाने दुःख होत आहे, अशी भावना त्यांचे समकालीन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड क्रांतिकुमार कडुलकर यांनी व्यक्त केली.

तर कापुरहोळ ते शिरवळ येथपर्यंत अम्रुता ग्रुपचे सर्वेसर्वा हे दिलीप बाठे होते. कामगार क्षेत्रात आघाडीवर असलेला कामगार नेता व भोर तालुक्यातील राजकीय क्षेत्रात दबदबा असणारा नेता आज हरपला, अशी भावना बी. बी. जाधव यांनी. व्यक्त केली.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles