पुणे : पुणे शहरातील कात्रज, हडपसर, येरवडा, पर्वती, कॅम्प, शिवाजीनगर या परिसरात राहणाऱ्या अंध, अपंग, निराधार, विधवा, घरेलू आणि संस्थेच्या महिला कामगार सक्षमीकरण कार्यक्रमातील सहभागी युवती यांना एचएसबीसी आणि विप्ला फाउंडेशन या सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने किराणा किट वितरित करण्यात आले. एकूण ३५० लाभार्थीना दोन महिने पुरेल इतका संपूर्ण किराणा वितरण करण्यात आला.
कार्यक्रमात कार्यक्रम व्यवस्थापक जैद कापडी यांनी सांगितले की, असुरक्षित, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांचे विशेषतः विधवा आणि अपंगांना कुटुंब चालवताना दिलासा देण्यासाठी आम्ही धान्य किराणा देत आहोत, त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमातून या गरीब जनतेच्या मुलीना किमान उत्पन्न देणारा रोजगार आम्ही देणार आहोत.
एचएसबीसीच्या दामिनी खैरे, गिरीश बिदाणी आणि विपला फाउंडेशनचे प्रमुख पदाधिकारी हावोवी वाडिया, जैद कापडी, प्रवीण जाधव, विनोद भालेराव, सुमित सोनावळे, गायत्री दीक्षित, विश्वनाथ बी व्ही, शेहबाज मुल्ला, आदिनाथ जगताप, धनश्री दुर्गाडे यांच्या हस्ते किराणा वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन कृतिका शिंदे, सुचित्रा मारणे, ज्योती जगताप, उमेश दारवटकर यांनी केले.