Pune : सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या वतीने नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आले. काल (ता. १० जुलै) येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर या ठिकाणी वितरण समारंभ संपन्न झाला. नागरिकांना सर्व शासकीय दाखले मोफत व कमीतकमी वेळेत मिळावेत म्हणून सुरेंद्र पठारे फाऊंडेशन गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नशील आहे. उत्पन्न दाखला, डोमिसाईल दाखला, तसेच ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र इत्यादि दाखले यावेळी वितरित करण्यात आले. दिपप्रज्वलन तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत समारंभाची सुरुवात झाली.
२१ ते २३ जून या कालावधीत येरवडा येथे शासन आपल्या दारी योजेनेंतर्गत शासकीय दाखले मिळवून देण्यासंबंधी सुरेंद्र पठारे फाऊंडेशनने उपक्रम राबवला होता. नागरिकांचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला होता. याच उपक्रमात नागरिकांनी आवश्यक दाखल्यांसाठी केलेल्या मागणीवरून प्राप्त झालेल्या दाखल्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. एकूण १००७ दाखल्यांचे वाटप झाले. उर्वरित नागरिकांच्या दाखल्यांचे वाटप येत्या काही दिवसांत होणार असल्याचे सांगण्यात आले. (Pune)
“शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासनाच्या योजनेच्या माध्यमातून नागरिकांनी एकाच जागेवर व अल्पावधीतच सर्व शासकीय दाखले मिळवून देण्यासाठी विविध ठिकाणी हा उपक्रम राबवून आम्ही प्रयत्न करतोय. नागरिकांना या उपक्रमाचा खूप फायदा होतोय. विशेषत: विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालय प्रवेशासाठी विविध कागदपत्रांची भासणारी गरज या माध्यमातून पूर्ण करता आली. जेणकरून, आता त्यांची प्रवेश प्रक्रियाही सुरळीत पार पडेल, याची खात्री आहे. वयोवृद्ध नागरिकांची जास्त धावपळ होता ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र मिळाले. अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे पूर्ततेसाठी नागरिकांना या उपक्रमाचा फायदा झाल्याचे पाहून समाधान वाटते आहे. तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयातील अधिकारी वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांचेही मनापासून आभार आहेत, असे मत सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केले. (Pune)
या दाखले वितरण समारंभाच्या निमित्ताने वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे हेही उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नागरिकांना दाखल्यांचे वाटपही करण्यात आले. तसेच, अतिशय स्तुत्य व नागरिकांची गरज ओळखून राबवलेला हा उपक्रम आहे, अशा शब्दांत त्यांनी सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे व अधिकारी वर्गाचे कौतुक केले. येरवडा विभागाच्या मंडळ अधिकारी श्रीमती सिमा गेंजजे, तलाठी माधुरी खडसे व कोतवाल ज्ञानेश्वर पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Pune


हेही वाचा :
धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !
भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!
Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
वसंत मोरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी
मोठी बातमी : राज्यातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के: नागरिकांत भीतीचे वातावरण