Tuesday, January 14, 2025
HomeNewsपुणे : 'दिघी ते गेट वे ऑफ इंडिया' पर्यावरण पूरक सायकल रॅली...

पुणे : ‘दिघी ते गेट वे ऑफ इंडिया’ पर्यावरण पूरक सायकल रॅली !

दिघी : पर्यावरण पूरक स्वच्छता संदेश देत सायकल रॅलीच्या माध्यमातून पुणे – मुंबई महामार्गावरील नाम फलक व दिशादर्शक फलकांची स्वच्छता तसेच झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आडवा, पाणी जिरवा, सायकल चालवा, इंधन वाचवा, आपली मुलगी सुरक्षित मुलगी आदी पर्यावरण निसर्गसंवर्धन जनजागृती व शरीर यष्टी साठी सायकल किती महत्त्वाची आहे या बाबत सायकल रॅलीतून जनजागृती करण्यात येणार आहे.

या निमित्ताने दिघीतील सायकलपटूनां शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे यांच्या शुभ हास्ते टि शर्ट चे अनावरण करण्यात आले.

तसेच या राॅलीतील सायकल पटूनां शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर उपमहापौर हिरा घुले, माजी महापौर नितीन काळजे, नगसेविका निर्मला गायकवाड, माजी सैनिक अध्यक्ष अशोक काशिद, सायकल पटू सचिन भैया लांडगे, संजय गायकवाड, युवा नेते उदय गायकवाड, अविरत संस्थेचे राजेंद्र माळी, दिघी विकास मंचाचे के. के. जगताप, सुनिल काकडे, नाभिक संघटनेचे संदिप पंडित, युवा सेनेचे भाग्यदेव घुले आदी उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नामदेव रढे यांनी केले, तर  आभार सायकलपटू दत्ता घुले यांनी मानले.


संबंधित लेख

लोकप्रिय