पुणे : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तंबाखू, गुटखा, दारू यांचे चढ्या भावाने छुपी व्रिक्री चालू आहे. तर चोरट्या मार्गाने अवैध वाहतूक सुरु आहे. तरी अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने आता लॉकडाऊन लागू केला आहे. मागच्या लॉकडाऊन मध्ये नागरिकांना तंबाखू , गुटखा, दारू यांच्या खरेदीसाठी 5 पटीने किंमत मोजून विकत घ्यावे लागत होते.
यावेळी सुध्दा लॉकडाऊन मुळे तंबाखू, गुटखा व दारू यांची जास्तीच्या भावाने बाजारात विक्री सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व वस्तूंची चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासनाने लक्ष घालून या सर्व मालांची कोणत्याही प्रकारची जास्तीच्या भावाने बाजारात विक्री होणार नाही या कडे लक्ष द्यावे. तसेच ज्या ठिकाणी जास्तीची किंमत आकारण्यात येईल, त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.