Manoj jarange patil : मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या नाटकाच्या प्रयोगांच्या आयोजनाच्या पैसे न दिल्याप्रकरणी संबंधित नाट्यनिर्मात्याने कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पुणे न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांच्या शिवबा संघटनेनं 2013 साली एका नाटकाचं आयोजन केलं होतं.
जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्यावर 2013 मध्ये आयोजित नाटकाच्या प्रयोगाचे पैसे न दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते, परंतु आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर मनोज जरांगे एकदा न्यायालयासमोर हजर राहिले होते, त्यावेळी 500 रुपयांचा दंड करून वॉरंट रद्द करण्यात आले होते.
मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांचे उपोषण सुरु
मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरेचा कायदा करणे, तसेच मराठा आरक्षण आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावेत, या मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण सुरु केले आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत
मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !
ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड
गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर
नागपूरसह विदर्भात अतिवृष्टी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा
आरक्षण विरोधी आंदोलनात 114 मृत्यू, देशभर संचारबंदी