Saturday, September 28, 2024
Homeताज्या बातम्याPune Car Accident : अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह...

Pune Car Accident : अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर

Pune Car Accident : पुण्यात एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्यात (१८ मे) रात्री पोर्शे पॅनामेरा या स्पोर्ट्स कारनं दुचाकीला धडक दिली, यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जमावानं चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या भीषण अपघातानंतर अवघ्या 15 तासांत आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला.

सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका वेगवान पोर्श कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अनिश अवधीया आणि अश्विनी कोस्टा अशी मृतांची नावे आहे. हे दोघेही पुण्यातील एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते. आरोपी कार चालक वेदांत अग्रवाल हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे आरोपी हा १७ वर्षीय असल्याची माहिती आहे.

या अपघातानंतर आरोपी वेदांतने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र जमावानं त्याला पकडत चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं. विशेष म्हणजे वेदांत अग्रवाल चालवत असलेल्या पोर्शे कारला नंबर प्लेटच नव्हती. त्यामुळे पोर्शे सारखी महागडी कार पुण्याच्या रस्त्यांवर नंबर प्लेट शिवाय धावलीच कशी असा प्रश्न विचारला जात आहे. या अपघातानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये शेजारी उभे असलेले लोक कार चालकाला मारहाण करताना दिसत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताप्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर आणि अल्पवयीन मुलाला दारू पुरवणाऱ्या बारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला जामीन मिळाला.

Pune Car Accident

न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटीही घातल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना अपघातावर निबंध लिहिण्यासह १५ दिवस येरवडा वाहतूक पोलिसात स्वेच्छेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. अल्कोहोल सोडण्यास मदत करण्यासाठी अल्पवयीन व्यक्तीला डॉक्टरांचा मानसोपचार सल्ला घेण्यास देखील सांगितले आहे. तसेच वेदांत अगरवालला भविष्यात अपघात झाल्याचे दिसल्यास त्याला अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ब्रेकिंग : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

२० दिंडोरी, २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान

ब्रेकिंग : 10th, 12th बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट

पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? वाचा काय म्हणाले मोदी !

25 दिवसांनंतर बेपत्ता अभिनेता घरी, अभिनेत्याने केला मोठा खुलासा

तुम्ही RSS सुद्धा नष्ट करायला निघाले उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

ब्रेकिंग : सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, चांदीचाही विक्रम

ब्रेकिंग : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे RSS बद्दल मोठे विधान

पुण्यात विकृतीचा कळस ! पत्नीच्या गुप्तांगला लावले कुलूप

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

संबंधित लेख

लोकप्रिय