अण्णाभाऊ साठे पुतळ्याची पूर्ण दक्षता आणि सुशोभिकरण करूनच मेट्रो चे काम करणार महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांचे आश्वासन (Pune)
पुणे : पुणे महामेट्रोचा विस्ताराचे काम चालू असून निगडी येथील भक्ती शक्ती स्थानकावर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा आहे. याला लागूनच मेट्रो स्टेशन चे काम चालू आहे त्यामुळे पुतळ्याला कोणतीही बाधा येऊ नये तसेच पुतळ्याचे योग्य सुशोभीकरण करूनच मेट्रो स्टेशन चे विस्तारीकरण करा, अशी मागणी आमदार अमित गोरखे यांनी महामेट्रो चे महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. (Pune)
आज पुण्यातील मेट्रो च्या मुख्य कार्यालयात पिंपरी चिंचवड येथील विविध सामाजिक संघटाबरोबर मेट्रो चे महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांची बैठक पार पडली. या बैठकीचे आयोजन आमदार अमित गोरखे यांनी केले होते.
या बैठकीत स्थानिक समाजाच्या लोकभावना आमदार गोरखे यांनी मेट्रो प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला कोणतीही बाधा येऊ नये.
पुतळा परिसराची योग्य असे सुशोभीकरण करावे. या स्थानकास लोकशाहीर अण्णा भाऊ साठे भक्ती शक्ती स्थानक असे नाव देण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
समाजाच्या सर्व मागण्याचा सकारात्मक विचार करणार असल्याचे आश्वासन मेट्रो चे महाव्यवस्थापक श्रावण हर्डीकर यांनी यावेळी दिले.
या बैठकीस आमदार अमित गोरखे, जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे, माजी अध्यक्ष भगवान शिंदे, नाना कसबे, सतीश भवाळ, सुनील भिसे, अरुण जोगदंड, संजय ससाणे, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष नितीन घोलप, सचिव बाळासाहेब रसाळ, उपाध्यक्ष नाना कांबळे, शिवाजी साळवे, मारुती जाधव, शंकर खवळे, रोहन भिसे, धीरज वाघमारे, महेंद्र क्षीरसागर, विवेक बुचडे, सुरेश चव्हाण, नाथा शिंदे यासह विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
***
***
***
***
***
***
***
***