Thursday, December 26, 2024
Homeराज्यतब्बल चार दिवसांनी पुणे बंगळूर महामार्ग अंशतः सुरू?

तब्बल चार दिवसांनी पुणे बंगळूर महामार्ग अंशतः सुरू?

शिरोली (कोल्हापूर) : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल चार दिवसांनी आज सकाळी दहा वाजता सुरू करण्यात आला आहे. त्यावेळी पाणी, पेट्रोल, डिझेल, दूध, ऑक्सीजन व मालवाहतूक ही अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहणे महामार्गावरील एक फूट पाण्यातून सोडण्यात आली. 

दक्षिण भारताला जोडणाऱ्या या आर्थिक दृष्टया महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी फिडण्यासाठी पोलीस, महामार्ग प्राधिकरण, महसूल विभागाचे शेकडो अधिकारी आणि कर्मचारी जीवाची बाजी लावून या ठिकाणी काम करत आहेत. 

महामार्गावर एका बाजूला सुरक्षीततेसाठी पॉकलॅड उभा करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहन कोल्हापूरात पोचल्याने, शहरातील पेट्रोल, डिझेल उपलब्ध होणार आहे. तसेच पुणे महापालिकेचे पाण्याचे टॅंकर शहरात पोचले आहेत, त्यामुळे शहरात टॅंकरने पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. मात्र अद्याप प्रवाशी वाहतूक सुरू झालेली नाही.

दरम्यान, महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे अवजड वाहतूक सुरू झाली असून, प्रवाशी वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे महामार्ग सुरू झाला असे समजून कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय