Monday, February 3, 2025

Pune : शालेय पोषण आहारातून अंडी बंद – डॉ. कल्याण गंगवाल यांच्या लढ्याला यश

पुणे (क्रांतीकुमार कडुलकर) – शालेय पोषण आहारातून अंडी बंद करून महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचे पाऊल उचललेले आहे. महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. कारण अंड्यांवरती कोणतेही एक्सपायरी डेट नसते. त्यामुळे ती अंडी ताजी की शिळी हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे पोषण आहारात विद्यार्थ्यांच्या शरीरासाठी घातक होती. असे मत शाकाहार चळवळीचे पुरस्कर्ते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी व्यक्त केले. (Pune)

गेल्या अनेक वर्षांपासून शाकाहारासाठी डॉ. कल्याण गंगवाल लढा उभारला आहे. त्यांच्या या लढ्याला यश मिळाले असून  आता शालेय पोषण आहारातून अंडी कायमची बंद केली आहेत.

डॉ. गंगवाल म्हणाले, की शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला अंड्यांची बिलकुल गरज नाही. कारण की अंड्यामध्ये १३.५ टक्के प्रोटीन असते. तर गव्हामध्ये २० -२५ टक्के आणि सोयाबीन मध्ये ४० -४५ टक्के प्रोटीन असते. शालेय आहारात अंडी नसली तरी काही फरक पडत नाही.  उलट अंड्यांमधली विषारी द्रव्य मुलांपर्यंत पोहोचणार नाहीत. प्रत्येक अंड्यामध्ये ३००-३५० मिली ग्रॅम कोलेस्ट्रॉल असते. जे हृदयाला उपायकारक आहे. कोंबड्यांला अनैसर्गिक आहार दिला जातो, त्यामुळे अंड्यात अनेक टॉक्सिन्स येतात. या पूर्वी अंड्यामध्ये डि. डी. टी (DDT) चे  अंश सापडले होते.

ते पुढे म्हणाले की, कोंबड्यांना अँटिबियटिक्स, हॉर्मोन्स दिले जातात. त्याचे अंश अंड्यात येतात. अंड्यामध्ये साल्मोनेला – टायफॉईडचे जंतू अनेक वेळा आढळतात. अंडी तयार करण्यासाठी कोंबड्यांवर पोल्ट्रीफार्ममध्ये भयानक अत्याचार केले जातात. अंडे २४ तास उजेडात ठेवणे, डीबेकिंग ऑपरेशन ऑपरेशन (चोंच तोडणे) केले जाते, व कोंबडीला केवळ अंडी देणार मशिन म्हणून ट्रीटमेंट देणे, हे सर्वच क्रूर आणि अत्याचारी आहे, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मी उभा केलेल्या  प्राणी आणि पक्षी संरक्षणाच्या लढ्याला अखेर यश आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाची विशेष आभार मानतो की हा त्यांनी घेतलेला निर्णय खूप योग्य आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

महाराष्ट्र सरकारने ७ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करत शाळेतील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात उकडलेली अंडी, अंडा भुर्जी, अंडा बिर्याणी, केळी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा शासन निर्णय ५ डिसेंबर २०२३ पासून लागू केला होता. शास्त्रीयदृष्ट्या मांसाहार आरोग्यास हानिकारक आहे. डॉ. कल्याण गंगवाल पोषण आहारात अंडी दिली जाऊ नयेत,” अशी मागणी  गंगवाल केली होती. (Pune)

नुकताच राज्य सरकारने शालेय शिक्षण आहारातून अंडी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे एक प्रकारे डॉ. कल्याण गंगवाल त्यांच्या लढ्याला यश आहे. अशी माहिती पत्रकाद्वारे त्यांनी दिली.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles