Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : वास्तुशास्त्राचे धडे देणारी सहल

Pune : वास्तुशास्त्राचे धडे देणारी सहल

पुणे : ज्योतिष वास्तु संशोधन केंद्र, पुणे यांच्या वास्तु विशारद बॅच क्रमांक 15 ची वास्तुशास्त्राचा अभ्यास पूर्ण दौरा नुकताच 30 व 31 ऑगस्ट रोजी कोकणच्या निसर्गरम्य श्रीहरी हरेश्वर या ठिकाणी दोन दिवस संपन्न झाला. (Pune)

या कोकणच्या निळा शुभ्र अथांग समुद्र फेसलेल्या लाटा, रुपेरी लांब किनारे , हिरवीगार केतकीची बने, उग्र वासाचा केवडा, गडद हिरव्या रंगाची उंच उंच सुरुची वृक्ष वाऱ्यापासून गावाचे रक्षण करीत होते नारळ, सुपारी केळी, फणस यांची झाडे या निसर्गाचा आनंद घेत वास्तुशास्त्र वर्गाचे विद्यार्थी पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, रत्नागिरी, परभणी या ठिकाणाहून हरिहरेश्वरच्या श्री ओम प्रकाश कोथळकर गुरुबंधूच्या” ओम श्री होम या स्वामींच्या घरामध्ये येत होती.

वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या आगमनाने हा सर्व परिसर भक्तीमय होऊन गेला होता.

ओम प्रकाश कोरथळकर यांनी गुरुजींचे स्वागत केले. गुरुजींनी सर्व विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्र व श्री हरी हरेश्वर या स्थानाविषयी मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी गाणी, भजन नृत्य, कलागुण सादर केली दुसऱ्या दिवशी सकाळी कालभैरवाचे दर्शन घेऊन मुख्य देवळामध्ये अगस्त मुनींनी स्थापन केलेल्या ब्रह्मा,विष्णू महेश, सह पार्वती या त्रिलिंगावर अभिषेक करण्यात आला. (Pune)

गुरुजींनी श्री क्षेत्र हरिहरेश्वरच्या ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, आणि ओम प्रकाश कोथळकर या गुरुबंधूच्या वास्तूचा वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाण परीक्षण कसे करावे यांचे मार्गदर्शन केले.

यानंतर वर्गातील सर्व गुरुबंधू, भगिनींनी कोकणातील रुचकर असा आहाराचा आस्वाद घेतला व ओम प्रकाश कोळथ कराचे आभार मानून परशुरामाने वास्तव्य केलेल्या श्रीहरी हरीश्वराच्या पवित्र स्थानाचा निरोप घेऊन आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

संबंधित लेख

लोकप्रिय