Sunday, February 16, 2025

PUNE : बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यावर कारवाई करू

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आश्वासन

बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या बैठकीत आश्वासन

पुणे /क्रांतीकुमार कडूलकर : बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर बाबी तपासून कारवाई बाबत योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कॅब, टॅक्सी, ऑटो, रिक्षा संघटना प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला दिले. (PUNE) आवश्यकता पडल्यास कुल कॅबला मीटर परवानगी देण्याबद्दल कायदेशीर पडताळणी करा. (PUNE) जरी शक्य होत असेल त्या संघटना कुल कॅब मीटरने व्यवसाय करून नागरिकांना प्रवासी सेवा देणार असतील तर ही चांगली गोष्ट आहे. यामध्ये कायदेशीर बाबी पूर्ण करा, असे आदेश यावेळी पुणे पोलीस आयुक्त यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली. We will take action against companies that transport illegal passengers

यावेळी बाबासाहेब कांबळे(राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन)मिलिंद भाऊ गायकवाड(राजे प्रतिष्ठान कॅप संघटना)अंकुश दाभाडे (राजे प्रतिष्ठान कॅप संघटना)अप्पाराव घुगे(सारथी वाहतूक असोसिएशन)अजय मुंडे(टॅक्सीअसोसिएशन)वर्षाताई शिंदे(मासाहेब कॅब संघटना) बिरुद्र्व पालवे, (महाराष्ट्र टुरिस्ट टॅक्सी संघटना) आनंद तांबे (राष्ट्रीय संघटक ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन) अमन कुचेकर, (आधार कॅब फाउंडेशन) संजय पवार (छत्रपती कॅब संघटना), माऊली सोनवणे (राजे प्रतिष्ठान कॅब संघटना), किरण सोनवणे, दादासाहेब माने, चंद्रकांत ताकवले आदी या वेळी उपस्थित होते.

पोलिस आयुक्तांसमोर बाबा कांबळे यांनी विविध मागण्या मांडल्या. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये ओला उबेर व अन्य कंपन्यांमार्फत प्रवाशांना सेवा दिली जात आहे. सुमारे दीड लाखापेक्षा अधिक कॅब, टॅक्सी, ऑटो रिक्षा चालक प्रवासी सेवा देत आहेत. परंतु या सर्व चालकांची भांडवलदार कंपन्यांच्या वतीने लूट होत आहे. अत्यंत तुटपुंजे मानधन दिले जात आहे. आठ रुपये किलोमीटर असे भाडे दिले जाते.

याबद्दल प्रादेशिक परिवहन विभागाने खटवा कमिटीचे अंतर्गत पंचवीस रुपये भाडेवाढ निश्चित केली आहे. परंतु या भाडेवाढीची अंमलबजावणी होत नाही. यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील दहापेक्षा अधिक मोठ्या संघटना एकत्र आले असून त्यांनी गेल्या काही दिवसापासून हा प्रयत्न सुरू केला आहे. या अंतर्गत पुणे पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन या प्रश्नांबाबत तोडगा काढण्याची मागणी केली. एक तासापेक्षा अधिक चर्चा झाली. यावर अत्यंत समाधानकारक चर्चा झाली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली आहे.

दोन दिवसापूर्वी ऑटो रिक्षा, टॅक्सी दर निश्चितीची बैठक आयोजित करूनही भाववाढी संदर्भात योग्य निर्णय झाला नाही. आरटीओ अधिकाऱ्यांसह रिक्षा चालक संघटनांच्‍या पदाधिकाऱ्यांची चर्चा त्‍यामुळे विस्‍कटली आहे. त्‍या विरोधात नाराजी व्‍यक्‍त सर्व संघटनांच्या वतीने उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पोलिसांनी संघटनांना नोटीस देऊन उपोषणाची परवानगी नाकारली. खटवा समितीच्या शिफारसीप्रमाणे पुणे आरटीओच्‍या कमिटीने कॅबसाठी 25 रुपये दर निश्चित केले आहेत. परंतु आरटीओ कमिटीचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हाधिकारी यांना ठरवलेल्या दराची अंमलबजावणी करता येत नाही.

पुणे जिल्हाधिकारी व आरटीओ विभाग ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांसमोर हतबल झाले आहे का, असा संतप्‍त प्रश्न ऑटो, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी उपस्‍िथत केला होता. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऑटो रिक्षा, टॅक्सी दरवाढी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ऑटो, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सहभाग घेतला होता. या आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी व आरटीओ अधिकारी यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्‍यामुळे ऑटो, टॅक्सी चालकांच्या संघटना आक्रमक होत प्रशासनाचा निषेध केला.

ओला, उबेर आणि रॅपिडो कंपन्यांना कोणत्याही प्रकारची अधिकृतपणे परवानगी दिलेली नाही. ओला, उबेर, रॅपिडोवर चालणाऱ्या सर्वच कंपन्या या बेकायदेशीर असून यांना कोणत्याही प्रकारचा परवाना नाही, हे स्वतः पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. परंतु या कंपन्यांवरती कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी दाखवत नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भांडवलदार धोरणाच्या विरोधामध्ये व आरटीओ विभागाच्या मनमानी कारवाईच्या विरोधामध्ये लढा उभारणा असल्‍याचे बाबा कांबळे यांनी सांगितले. त्याबाबत पोलिस आयुक्तांची भेट घेतली. मात्र पोलिस आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने संघटनांनी समाधान व्यक्त केले.

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : घरगुती गॅस च्या किंमती तब्बल इतक्या रुपयांनी होणार कमी

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : सीएनजीच्या दरात मोठी कपात, सर्वसामान्यांना दिलासादायक

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले.

ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध १८६५ तक्रारी प्राप्त; ७३९ परवाने निलंबित, वाचा काय प्रकरण

Related Articles

- Advertisement -

Latest Articles