Sunday, September 8, 2024
Homeताज्या बातम्याPune Accident : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त

Pune Accident : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त

Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात रोज नवनवीन खूलासे होत आहेत. या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांन्त अगरवाल याच्या ब्लड रिपोर्टमध्ये (Blood Report) फेरफार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन डॉक्टर अडकल्यानं ससून हॉस्पिलटची पुरती नाचक्की झालीय. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारनं एक विशेष तपास पथक नियुक्त केले आहे.

ससून सर्वोपचार रुग्णालयातील दोन डॉक्टरांना कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्याची अदलाबदल केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चौकशीसाठी सरकारनं एक विशेष तपास पथक नियुक्त केले आहे. या चौकशी समितीवर सुरूवातीपासूनच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. जे.जे. हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे त्याच्या अध्यक्षपदी आहेत.

याशिवाय, या समितीमध्ये डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या SIT समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने त्या वादात आहेत. त्यामुळे एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. अशात चौकशीसाठी आलेल्या समितीने बिर्याणीवर ताव मारूल्याने समिती चांगलीच अडचणीत पाडली आहे.

कोणी काय खावे किंवा काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र रुग्णालया प्रशासनाने चौकशीसाठी आलेल्या समितीतील सदस्यांसाठी पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमधून बिर्याणी मागवण्यात आली. बिर्याणीवर आक्षेप नाही मात्र अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या दालनात मेजवानी सुरू असताना चौकशीसाठी बोलवलेल्या कर्मचाऱ्यांना जेवणास मनाई केली समितीचे सदस्य बिर्याणीवर ताव मारत असताना बाहेर कर्मचारी मात्र उपाशीपोटी ताटकळत उभे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आपल्यामुळे कोणीतरी ताटकळत, उपाशीपोटी उभे आहे, याचे भान समितीने ठेवणे अपेक्षीत होते.

Pune accident case

दरम्यान, चौकशीच्या नावाखाली पुण्यात येऊन बिर्याणीवर ताव मारणारी समिती बरखास्त करा अशी मागणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल

जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता

ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का

मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !

ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान

NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

युनिट मुख्यालयाच्या कोट्यासाठी अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

संबंधित लेख

लोकप्रिय