Thursday, April 25, 2024
Homeआरोग्यपुणे : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ९८ वी वार्षिक सर्वसाधारण...

पुणे : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ९८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

जुन्नर : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ९८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पतसंस्थेच्या राजा शिवछत्रपती सभागृहात संस्थेचे सभापती साहेबराव मांडवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आमदार अतुल बेनके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आ. बेनके म्हणाले, जुन्नर तालुका हा शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत अग्रक्रमावर आहे. कोविड काळात ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचे काम शिक्षकांनी प्रामाणिक व दर्जेदारपणे केले आहे. परंतु राज्य लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या परीक्षेत जुन्नर तालुका हा पुढे असावा म्हणून स्पर्धा परीक्षेचा पाया प्राथमिक शाळेत ज्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून घातला जातो. 

हेही वाचा ! जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आणि जुन्या बसस्थानकाची आमदार बेनके यांच्याकडून पाहणी !

स्पर्धा परिक्षांकडे शिक्षकांनी अधिक गांभीर्याने पहावे म्हणून व शिक्षकांच्या मेहनतीला प्रोत्साहन मिळावे या करिता शिक्षकांना “शिष्यवृत्ती आमदार चषक” देण्यात येणार असल्याचेही आ. बेनके यांनी सांगितले. 

शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये ज्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे जुन्नर तालुक्यात सर्वात जास्त विद्यार्थी हे शिष्यवृत्ती जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले असतील त्यांना हा चषक देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला जाणार आहे. या वर्षीच्या तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार कार्यक्रम प्रसंगी हा चषक देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात येईल, असेही बेनके म्हणाले.

यावेळी उपसभापती शरद शिंदे, संचालक विजय कुऱ्हाडे, संचालक सयाजीराव हाडवळे, शिक्षक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब लांघी, संघाचे अध्यक्ष विकास मटाले, समितीचे सरचिटणीस राजेश दरगुडे, जिल्हा जिल्हा संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, विलास साबळे, राजेंद्र गारे, चंद्रकांत डोके, सुनील शेलार, मंगेश मेहेर, रविंद वाजगे, नामदेव मुंढे, प्रवीण पारवे, संतोष पानसरे आदीसह उपस्थित होते.


हेही वाचा ! पुणे : जुन्नर येथे किसान सभेचे हल्लाबोल आंदोलन !

हेही वाचा ! ट्रायबल फोरम ची विधानसभा उपाध्यक्षांकडे महत्वपूर्ण मागणी


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय