पुणे : पावसामुळे मुळशी तालुक्यातील सुप्रसिद्ध लवासा प्रकल्पात दरड कोसळून २ बंगले भूमीखाली गाडले गेले आहेत. या बंगल्यात ३ ते ४ जण रहात होते, ते बेपत्ता झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. (Pune)
बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जात आहे. मुळशी तालुक्यातील लवासा येथे ४५३.५ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे डोंगररांगातून वाहणार्या पावसाच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. टेमघर कडून लवासाच्या दिशेने जाणाऱ्या रस्ता खचला आहे 4 चाकी वाहने जायला धोकादायक रस्ता झाला असून टेमघर येथे रस्ता खचला असल्याने लवासाकडे येणाऱ्या नागरिकांनी प्रवास टाळावा. असे प्रशासनाने आवाहन केले आहे. (Pune)
दरडीखाली दबलेल्या तीन बंगल्यांपैकी एका बंगल्यात काही काम सुरु होते. या कामाकरिता आलेले कर्मचारी या दरडीखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Pune)
लवासा सीटी ते वरसगाव या रस्त्यावरील अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या असून संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. संपूर्ण मौसे खोऱ्यामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे विद्युत काम कोसळून विज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे मोसे व लवासा सिटी परिसरात संपूर्ण जीवन विस्कळीत झाले आहे. (Pune)