Friday, March 29, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपुणे : दादासाहेब जगताप यांची १०७ वी जयंती साजरी !

पुणे : दादासाहेब जगताप यांची १०७ वी जयंती साजरी !

पुणे : दापोडी येथील जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. ज. बा जगताप तथा दादासाहेब जगताप यांची १०७ वी जयंती (स्नेहदिन) शनिवार दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजी जनता शिक्षण संस्थेचे, श्रीमती. सी.के. गोयल महाविद्यालय, दापोडी, येथे सकाळी ठीक १०:०० वा. साजरी करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ .सुभाष सूर्यवंशी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख, प्रोफेसर डॉ. बाळासाहेब माशेरे, यांच्या हस्ते दादासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन, आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन! करण्यात आले.

विशेष लेख वन निवासींवरील अन्याय थांबवा ! – डॉ. अजित नवले

याप्रसंगी प्रा.सिद्धार्थ कांबळे, प्रा. डॉ. स्वाती काळभोर, प्रा. सोमनाथ दडस, प्रा. सुरेखा हरपुडे, प्रा.अमरदीप गुरमे, प्रा. विनोद डी. के, प्रा. ज्योती लेकुरे, प्रा. गौतम गोरड, प्रा. दिपाली खर्डे. उपस्थित होते. प्राध्यापकेत्तर कर्मचारी वर्गामध्ये लक्ष्मण कोहिनकर, कांताराम खामकर, लक्ष्मण मुरकुटे, उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना प्रभारी प्राचार्य, डॉ.सुभाष सूर्यवंशी म्हणाले, “जनता शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य ‘बलविद्यामुपास्व’याला अनुसरून महाविद्यालयाची वाटचाल चालू ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊ !”

हेही वाचा ! एस. एम. जोशी कॉलेजमध्ये AIR Next स्पर्धेचे आयोजन

कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी केले. आभार प्रा.सिद्धार्थ कांबळे यांनी मानले.

हेही वाचा ! बंपर भरती : ESIC Recruitment 2022 : ईएसआयसीत क्लर्क भरती


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय