Friday, April 19, 2024
Homeजिल्हाअण्णाभाऊंचा रशियाचा प्रवास या पुस्तिकेचे प्रकाशन

अण्णाभाऊंचा रशियाचा प्रवास या पुस्तिकेचे प्रकाशन

बार्शी : कॉम्रेड डॉ. प्रविण मस्तुद लिखीत “अण्णा भाऊंचा रशियाचा प्रवास” या पुस्तिकेचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे सर यांच्या हस्ते कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीमध्ये प्रकाशित करण्यात आले. या वेळी कम्युनिस्ट  पक्षाकडून दलित पँथरचे शहिद भागवत जाधव व रमेश देवरुखकर या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

“कॉम्रेड अण्णाभाऊ हे श्रमिकांचा विचार जगले, श्रमिकांचा विचार ज्या रशियामध्ये क्रांतीने आला तो रशिया पाहण्यासाठी अण्णाभाऊ रशिया पर्यंत जाऊन पोहोचले,

रशियामध्ये अण्णाभाऊंनी जे पाहिले जे अनुभवले ते या पुस्तिकेमध्ये नक्की वाचावयास मिळेल” असे यावेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले.

पुस्तक प्रकाशना वेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे ठोंबरे, कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद, कॉम्रेड ए.बी. कुलकर्णी, कॉम्रेड लहू आगलावे, कॉम्रेड भारत भोसले, कॉम्रेड अनिरुद्ध नखाते आदी कॉम्रेड्स उपस्थित होते.

हेही वाचा ! आंबेगाव : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची किसान सभेची मागणी

हेही वाचा ! आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याचा डॉ. अजित नवले यांचा आरोप, …अन्यथा तीव्र आंदोलन

हेही वाचा ! नाशिक चलन नोट प्रेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४९ जागा

हेही वाचा ! राज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय