Thursday, February 6, 2025

दिल्लीच्या टिकरी सीमेवर लोकशाही अधिकारांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांची जाहीर सभा

नवी दिल्ली : १३ जून रोजी दिल्लीच्या टिकरी सीमेवर भारतीय किसान युनियन (एकता उग्राहान) ह्या पंजाबच्या एका मोठ्या डाव्या किसान संघटनेने एक आगळीवेगळी जाहीर सभा आयोजित केली. 

लोकशाही अधिकारांचे रक्षण आणि  केंद्र सरकारने विविध कायद्यांखाली तुरुंगात टाकलेल्या मानवाधिकार चळवळीतील कार्यकर्ते, विचारवंत आणि विद्यार्थी यांची मुक्तता या मुद्द्यांवर ही सभा आयोजित केली होती. त्यांत भीमा कोरेगावच्या धादांत खोट्या केसमध्ये ३ वर्षे जेलमध्ये असलेले १६ जण, दिल्ली दंगलीच्या तितक्याच खोट्या केसमध्ये जेएनयु, एएमयु, जामिया मिलिया विद्यापीठातील अटक केलेले विद्यार्थी, तसेच मोदी सरकारवर केवळ टीका केल्याबद्दल तुरुंगात टाकलेले अनेक पत्रकार, व्यंगचित्रकार आणि चित्रपट निर्माते यांचा समावेश आहे. प्रचंड पाऊस असतानाही शेकडो शेतकरी स्त्री-पुरुष सभेत हजर होते.

बीकेयुचे अध्यक्ष व ज्येष्ठ शेतकरी नेते जोगिंदर सिंग उग्राहान सभेच्या अध्यक्षस्थानी होते. मुख्य वक्त्यांमध्ये शहीद भगतसिंग यांचे पुतणे प्रा. जगमोहन सिंग, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, प्रसिद्ध साहित्यिक व नाटककार डॉ. सुखदेव सिंग सिरसा, डॉ. साहिब सिंग, नवशरण कौर, गुलझार पंधेर, जसपाल मनखेरा, एन. के. जीत यांचा समावेश होता. किसान सभेचे कोषाध्यक्ष पी. कृष्णप्रसाद उपस्थित होते. 

तीन-तीन वर्षे खटला न चालवता, आरोपपत्रही न ठेवता अन्यायकारकरीत्या तुरुंगात डांबलेल्या सर्वांची त्वरित मुक्तता करण्याची मागणी त्यांनी केली. 

२६ जून रोजी, शेतकरी आंदोलनाचे ७ महिने पूर्ण होत असताना, आणि १९७५ साली आणीबाणी अंंमलात आणल्याच्या दिनी, ‘शेती वाचवा, लोकशाही वाचवा’ ही संयुक्त किसान मोर्चाने देशव्यापी हाक दिली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles