Thursday, March 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी- चिंचवडमध्ये गोशाळा उभारण्यासाठी जागा अन् पायाभूत सुविधां द्या - आमदार महेश...

पिंपरी- चिंचवडमध्ये गोशाळा उभारण्यासाठी जागा अन् पायाभूत सुविधां द्या – आमदार महेश लांडगे यांची मागणी

पिंपरी चिंचवड : महापालिका हद्दीत गोशाळा- गो संवर्धन केंद्र सुरू करण्यासाठी जागा आणि पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी आग्रही मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त व प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राज्यात २०१४ मध्ये भाजप-शिवसेनेचे सरकारच्या काळात गोवंश हत्याबंदी कायद्याला मंजुरी मिळाली आहे. आता राज्यातील गो-संवर्धनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी आमची भावना आहे. शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या गायी, बैल आदी गोवंशाची संख्याही जास्त आहे. अनेकदा दूध न देणाऱ्या गायी अर्थात भाकड गायी शेतकऱ्यांकडून सोडून दिल्या जातात. असे गोवंश शहरातील रस्त्यांवर पहायला मिळतात. जखमी झाल्यामुळे किंवा आजारी असल्यामुळे संबंधित गोवंशाला उपचाराची आवश्यकता असते. अनेकदा उपचाराअभावी गायींचा मृत्यूही झाल्याची उदाहरणे आहेत.

तसेच, वयोवृद्ध झालेल्या गाईंची देखभाल करण्याचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून गोशाळा सुरू करण्याबाबत मागणी होत आहे. त्यासाठी गोशाळा आणि गो संर्वधन व उपचार केंद्र सुरू केल्यास गोवंश वृद्धीच्या दृष्टीने हितकारक ठरणार आहे. गोवंश संवर्धनासाठी ही काळाची गरज आहे. शहरात गो शाळा सुरू करण्याबाबत स्वयंसेवी संस्थांकरीता जागा आणि पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्यावी. याबाबत प्रशासक व आयुक्त म्हणून सकारात्मक भूमिकेतून निर्णय घ्यावा, अशीही मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.

  • क्रांतिकुमार कडुलकर
संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय