Thursday, February 20, 2025

नियोजित रमामाई स्मारकात रमामाई शिल्प सृष्टी उभारण्यासाठी पंचवीस कोटी रूपयांची तरतूद करा – बाबा कांबळे

पिंपरी : पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाच्या मागील परिसरामध्ये महामाता रमामाई भिमराव आंबडेकर यांचा पुतळा उभा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने नुकताच घेतला आहे अशी घोषणा महापौर माई ढोरे यांनी नुकतीच केली. या निर्णयाचे कष्टकरी जनतेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. तसेच हा पुतळा याच ठिकाणी व्हावा अशी मागणी पुर्वीपासूनच कष्टकरी पंचायतीच्या वतीने करण्यात आली होती. आता या ठिकाणी पालिकेच्यावतीने उभारण्यात येणा-या स्मारकामध्ये महामाता रमामाई भिमराव आंबडेकर यांचा पुतळा आणि रमामाईच्या कर्तुत्वाला व त्यागाला साजेसे रमामाई शिल्पसृष्टी स्मारक पालिकेने उभारावे आणि यासाठी किमान पंचवीस कोटी रूपयांची तरतुद तातडीने उपलब्ध करून दयावी अशीही मागणी कष्टकरी पंचायतीचे नेते बाबा कांबळे यांनी आज महापौर उषामाई ढोरे यांचेकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.

मंगळवारी (दि. 21 डिसेंबर) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बाबा कांबळे बोलत होते. यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर कांबळे, कष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, महिला आघाडी अध्यक्षा अनिता साळवे, रेबापलिकन युवा मोर्चा अधक्ष मेघा आठवले, आशा बाबा कांबळे तसेच अंजना गायकवाड, भिमशाही युवा संघटना अध्यक्ष शिवशंकर उबाळे आदी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमामाई आंबेडकर हे तमाम भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. रमामाई यांच्या जयंतीदिवशी 2020 साली देशातील पहिले फक्त महिला रिक्षा चालकांचे रिक्षा स्टँड पिंपरी चिंचवडमध्ये महापौर माई ढोरे यांच्या हस्ते उद्‌घाटन करुन सुरु केले आहे. नियोजित स्मारक भावी पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्हावे यासाठी सन 2016 पासून आम्ही मागणी करीत आहोत असेही बाबा कांबळे यांनी सांगितले.

या नियोजित जागेत कोणतेही अतिक्रमण नाही मात्र काही राजकीय व्यक्तींनी जाणीवपुर्वक वाद वाढवण्याच्या दृष्टीकोनातून सदर मोकळया जागेत अतिक्रमण केल्याची अफवा पसरवली आहे. वास्तविक पाहता, त्याठिकाणी कोणतेही अतिक्रमण नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या वतीने मुख्य सभेच्या ठरावाला अनुसरून (ठराव क्रमांक ६२५ दिनांक १८/०३/२०२१, सर्वसाधारण सभेचा ठराव आणि स्थायी समितीचा ठराव क्रमांक ८९१७ दिनांक २६/०२/२०२१) त्या ठिकाणी सार्वजनिक वाचनायलयाचे तात्पुरते अधिकृत शेड आहे. सदर जागा देखील रिकामी करुन रमामाई स्मारकासाठी पालिकेला ताबडतोब मोकळी करुन देणार असल्याचे मी व्यक्तीश: महापौर माई ढोरे यांना फोनव्दारे कळविले आहे. तरी देखील अशा प्रकारचा वाद निर्माण करणे दुर्दैवी आहे असे माझे मत आहे. दरम्यान महानगरपालिकेने रमाई पुतळया संदर्भात केवळ घोषण न करता येथे पंचवीस कोटी रूपयांचे रमामाई शिल्प सृष्टी उभारण्यासाठी स्थायी समिती मधून तात्काळ निधी उपलब्ध करून दयावा अशीही मागणी बाबा कांबळे यांनी केली आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर


Related Articles

- Advertisement -

Latest Articles