Monday, December 9, 2024
Homeकृषी९ ऑगस्ट क्रांतिदिनी केंद्र सरकार विरोधी सिटू, किसान सभा व शेतमजुर युनियनच्या...

९ ऑगस्ट क्रांतिदिनी केंद्र सरकार विरोधी सिटू, किसान सभा व शेतमजुर युनियनच्या वतीने निदर्शने

धारूर : ९ ऑगस्ट २०२१ रोजी क्रांतीदिनी केंद्र सरकारच्या विरोधी सिटू, किसान सभा व शेतमजुर युनियनच्या वतीने विविध मागण्या घेऊन केंद्र सरकारच्या विरोधी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शन करण्यात आली.

आज ९ ऑगस्ट या क्रांतीदिनी केंद्र सरकार विरोधी देश बचाव, हा नारा घेऊन आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसिल कार्यालयावर, जिल्हाधिकारी कार्यालयावर सीटू, किसान सभा व शेतमजुर युनियनच्या वतीने शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा, स्वामिनाथन सामितीच्या शिफारसी लागु करा, कामगार विरोधी कायदे रद करा, शालेय पोषण आहार कामगाराना तामिळनाडु राज्याप्रमाणे ११०००रू मानधन द्या, तालुक्यातील सर्व शेतमजुर लाभार्थ्यांना जॉब कार्ड द्या, २०२० चा पिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ द्या, आशा वकर्स यांना किमान वेतन १८ हजार रुपये द्या, आशा वकर्स कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायत स्थरावरील थकबाकी तात्काळ द्या, इत्यादीसह अनेक मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

यावेळी सीटू सघंटनेचे जिल्हा सचिव डॉ अशोक थोरात, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ, मोहन लांब, शेतमजुर युनियनच्या नेत्या कॉ, मनिषा करपे, शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या नेत्या कॉ. मिरा शिंदे, कॉ. काशिराम सिरसट, अॅड संजय चोले, वैशाली आडसुळ, लता खेपकर, लक्ष्मण डोंगरे, दादा सिरसट, भास्कर डापकर, मधुकर चव्हाण, शिवकन्या गोंदने, अशा वकर्स युनियनच्या रामकंवर कोथीबीरे, एकनाथ ढोरे इत्यादीसह अनेक जनसंघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी, कामगार उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय