माहूर : अखिल भारतीय किसान सभा, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया व संयुक्त किसान मोर्चा च्या वतीने तहसील कार्यालय माहूर येथे आज 26 मे रोजी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
शेतकरी – कामगार कायद्याच्या विरोधात, वाढत्या महागाईला आळा घाला, पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ थांबवा, गरजू रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यासह सरकटक कोवीड लसीकरण करा, विद्यार्थ्यांचे सेमिस्टर सह सर्व शुल्क परत करा, सर्व नोंदणीकृत बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता द्या, खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या गमावलेल्याना नुकसान भरपाई द्या, दहावी बारावी च्या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे नियोजन करा, या मागण्यांना घेऊन निषेध दिन पाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड शंकर सिडाम, काँग्रेस चे नगर अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे, किशोर पवार, प्रल्हाद चव्हाण राजकुमार पडलवार, दीपक ठाकूर, अंबादास आडे, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नांदेड जिल्हा सहसचिव प्रफुल कउडकर, महेश कांबळे, तुषार कांबळे, अभिषेक खंदारे हे उपस्थित होते.