Friday, March 14, 2025

अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे 15 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेवर आंदोलन

कोल्हापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस आपल्या प्रलंबित मागण्यासाठी 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर संपाची नोटीस देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने 15 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आप्पा पाटील व सरचिटणीस जयश्री पाटील यांनी दिली.

याबाबत बोलताना आप्पा पाटील म्हणाले, राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासनाने 26 जानेवारीपर्यंत समाधानकारक मानधन वाढ व जुने खराब व नादुरुस्त मोबाईल परत घेऊन नवीन मोबाईल देण्यात येईल, व पोषण ट्रेकर अॅप मराठीत करण्याबद्दल उच्च न्यायालयातील केसच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे मान्य केले होते. याबाबतीत 12 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे सह महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. 

याचे निषेधार्थ राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. याबाबतीत जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने आंदोलन करून निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Lic
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles