Thursday, July 18, 2024
Homeजिल्हाकेरळमधील एसएफआय कार्यकर्ता कॉ.धीरज यांच्या हत्येचा नांदगाव खंडेश्वरमध्ये निषेध !

केरळमधील एसएफआय कार्यकर्ता कॉ.धीरज यांच्या हत्येचा नांदगाव खंडेश्वरमध्ये निषेध !

नांदगाव खंडेश्वर : केरळच्या इडुक्की येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चा कार्यकर्ता कॉ.धीरज यांची युवक काँग्रेस – केएसयू (एनएसयूआयची केरळ शाखा) द्वारे केलेल्या हत्येचा एसएफआयने अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर येथे निदर्शने करून निषेध केला. या हत्येच्या निषेधार्थ आज (दि.११) एसएफआयने देशभरात निषेध दिवस पाळला. 

या भीषण हल्ल्यात एसएफआयचे आणखी दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. या खुनी टोळीचे नेतृत्व युवक काँग्रेसचे नेते निखिल पायली करत होता, असं आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थी संघटनेची निवडणूक काल (दि‌.१०) सकाळी कॅम्पसमध्ये शांततेत पार पडल्यानंतर हा पूर्वनियोजित हल्ला झाला. विद्यार्थी समुदायात प्रभाव गमावलेल्या काँग्रेसच्या गुंडांनी केरळमधील कॅम्पसमध्ये दहशत आणि भीती पसरवण्याच्या मोठ्या योजनेचा हा एक भाग होता. के.सुधाकरन हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा माणूस केरळमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष झाल्यापासून एसएफआय कार्यकर्त्यांवर काँग्रेसच्या गुंडांकडून हल्ले वाढत आहेत, असेही एसएफआय ने म्हटले आहे.

हेही वाचा ! केरळमधील इडुक्की येथे एसएफआयच्या कार्यकर्त्याची हत्या, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला अटक

गुन्हेगारांना कॅम्पसमध्ये आणून विद्यार्थी कार्यकर्त्यांची हत्या करणे आणि दहशत निर्माण करणे, हे काँग्रेसच्या माफिया संस्कृतीचा पर्दाफाश करते. केरळमधील काँग्रेस नेतृत्वाकडून सुरू असलेल्या खुनाच्या राजकारणाविरोधात सर्व लोकशाहीवादी वर्गांनी संतापाने उभा राहिले पाहिजे. कॅम्पसला खूनांचे मैदान बनवणाऱ्या सर्व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी एसएफआयने केली. कॉ.धीरज यांच्या हत्येचा करण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. या हल्ल्याला दोषी असलेल्या काँग्रेसच्या गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी एसएफआयने केली.

या निदर्शनेमध्ये एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, राज्य कमिटी सदस्य राजगुरू शिंदे, जिल्हा अध्यक्ष प्रशिक वाघमारे, जिल्हा सचिव विशाल शिंदे, चैतन्य साळवान, अंकेश  खोब्रागडे, गौरी राऊत, योगिता लांडगे, रेश्मा काळे, कोमल राऊत, योगेश शिंदे, जय बारसे, नेमीचंद गाढवे, रेयान शेख, ऋतिक शेलारे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा ! सातारा : केरळमधील एसएफआय कार्यकर्ता धीरज राजेंद्रनच्या हत्येचा निषेध !

हेही वाचा ! BSNL चा खाजगी कंपन्यांना दे धक्का, स्वस्त प्लॅनमुळे ग्राहकांचा कल वाढला

हेही वाचा ! राज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा

हेही वाचा ! NHPC मध्ये परिक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय