Thursday, August 11, 2022
Homeराज्यराज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार

राज्यातील विजाभज आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – मंत्री विजय वडेट्टीवार

spot_imgspot_imgspot_imgspot_img

मुंबई : राज्यातील विजाभजच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

राज्यातील विजाभजच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांच्या अडीअडचणी  संदर्भात वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी वडेट्टीवार म्हणाले, आश्रमशाळांच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न होत असतात. आश्रमशाळांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळांचे २०२०-२१ मधील अनुदान यासह विविध मागण्यांची इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पडताळणी करून तातडीने आश्रमशाळांच्या समस्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही वडेट्टीवार यांनी बैठकीत दिल्या.

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, सहसचिव दे.आ.गावडे, महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संचालक संघाचे अध्यक्ष रामदास चव्हाण यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय