Saturday, October 12, 2024
Homeजिल्हाSFI आयोजित शालेय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

SFI आयोजित शालेय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

नांदेड : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे माहूर तालुका कमिटी तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शालेय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माहूर येथील जगदंबा शाळेत पार पडले.

यावेळी SFI चे नांदेड जिल्हा सहसचिव प्रफुल्ल कउडकर, तालुका अध्यक्ष विशाल नरवाडे, शहर अध्यक्ष अभिषेक खंदारे, शहर सचिव महेश कांबळे, तुषार कांबळे,

ITI युनिटचे अध्यक्ष राहुल मोहिते, सचिव सुरज बसवंते आणि उपाध्यक्ष प्रथमेश बडेराव आणि SFI चे कार्यकर्ते धीरज राठोड, जय जाधव आदी उपस्थित होते. 

तसेच या कार्यक्रमास विश्वास जाधव, अमोल टनमने, संतोष वानखेडे आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा ! शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध

हेही वाचा ! तामिळनाडूच्या धर्तीवर रेशनदुकानात जीवनावश्यक पुरवठा करण्याची मागणी

संबंधित लेख

लोकप्रिय