जुन्नर : सेवानिवृत्ती नंतरचा वेळ संस्थेच्या कामासाठी द्यावा असे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून बोलताना सह्याद्री विद्या विकास मंडळाचे सचिव चंद्रशेखर दत्तात्रेय हुले यांनी केले. संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल निमगिरी विद्यालयाचे मुख्याध्यापक आप्पासाहेब रामभाऊ पवार यांच्या सेवापुर्ती कार्यगौरव समारंभात ते बोलत होते.
याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिमाया शक्ती विद्यालय इंगळून चे मुख्याध्यापक एम. के. ढोबळे यांनी केले. अखिल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष के एस ढोमसे, पंचायत समितीचे माजी सदस्य काळू गागरे, केवाडी गावचे सरपंच अमोल लांडे, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक नवनाथ हुले, जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह अशोक काकडे, शिवाजी मराठा शिक्षण संस्था जुन्नर चे व्हि.डी.पानसरे, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष संतोष ढोबळे, इंगळुन व, गावच्या सरपंच पुष्पा डामसे, पोलीस पाटील श्रीयुत दगडू डामसे, न्यू इंग्लिश स्कूल आंबोलीचे मुख्याध्यापक वाघ, न्यू इंग्लिश स्कूल आपटाळ्याचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेलार, न्यू इंग्लिश स्कूल खामगाव चे मुख्याध्यापक गांगुर्डे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तांबेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक फापाळे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी देवराम नांगरे, इंग्लिश टीचर असोसिएशनचे तेलोरे इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिक्षकांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल निमगिरीचे मुख्याध्यापक लांडे व आदिमाया शक्ती विद्यालयाचे वामन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संतोष पिंगळे अध्यक्ष मुक्तादेवी ग्रामविका संस्था नारोडी, सुनील पिंगळे महाराष्ट्र बँक नारोडी, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह पंकज घोलप, ग्राम विकास मंडळ ओतूरचे सचिव प्रदीप गाढवे, जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह आर. डी. ढोमसे, उपाध्यक्ष केंद्रे डी. एस., निमगिरीचे माजी पोलीस पाटील आणि आदिवासी विकास सोसायटीचे चेअरमन सुदाम भालिंगे, ज्ञानेश्वर शिंदे, बाळू तळपे, बाळासाहेब बोराडे, शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाचे थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
इशस्तवन आदिमाया शक्ती विद्यालय इंगळुन च्या विद्यार्थिनींनी सादर केले तर स्वागत गीत न्यू इंग्लिश स्कूल निमगिरीच्या विद्यार्थिनींनी सादर केले. याप्रसंगी दोन्ही विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम निरगुडे येथील रोकडे फार्म हाऊस येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इनामदार एस. आय. यांनी केले तर आभार प्रदर्शन दैनिक पुण्यनगरीचे वार्ताहर केंद्रे डी. एस. यांनी केले. या कार्यक्रमाला औटी, डी.डी.डमाळे, डी.बी.मानकर, जे.एस.गायकर, व्ही.एस.भालेराव, एस.एल.आल्हाट, यु.एस.मोरे, एस.बी.शिंदे, आर.बी.वाकचौरे, पी.एस.खुडे, ए.बी.पटेल, डी.एस.पिंगळे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अपार कष्ट केले.