मुंबई : देशाभरात आज स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची १३८ वी जयंती साजरी केली जात आहे. त्यानिमित्ताने देशात वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहे, तसेच मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेक नेते वीर सावरकर यांना आदरांजली वाहत आहे. मात्र, राज्यातील एका मंत्र्याने सावरकर यांच्या जयंतीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
कोविडची साथ हाताळता आली नाही याबद्दल मा. पंतप्रधानांनी देशाची माफी मागायला आजचा सावरकर जयंतीसारखा उत्तम मुहूर्त मिळणार नाही.
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) May 28, 2021
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मोदींवर निशाणा साधला आहे. “देशातील कोविडची साथ हाताळता आली नाही याबद्दल पंतप्रधानांना देशाची माफी मागायला आजचा सावरकर जयंतीसारखा उत्तम मुहूर्त मिळणार नाही”, अशी टीका राऊत यांनी मोदींवर ट्विटर वरून केली आहे.