Friday, March 14, 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पुणे शहरातील वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर असल्याने सध्या पुणे शहरात वेगाने मेट्रोचे काम सुरु आहे, येत्या पंधरा दिवसांत काम मार्गी लावण्याचे आदेशही मेट्रो प्रशासनाला देण्यात आले आहेत. मोदींच्या या दौऱ्यात मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे होणार उद्घाटन होणार आहे. यासोबतच इतर महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. 

देशातील सर्वात तरूण महापौर करणार आमदारासोबत लग्नं

आगामी महापालिका निवडणुका असल्याने पंतप्रधान मोदी यांची जाहिर सभा देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जुलै महिन्यात मेट्रो चाचणी पार पडली होती. 

शिवजयंती निमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन, राहुल गांधींचे देखील मराठीत ट्विट !

धक्कादायक ! अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या १३ वर्षाच्या मुलाचा आईने केला गळा आवळून खून

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ५३५ जागा!

Related Articles

- Advertisement -

Latest Articles