Friday, March 29, 2024
Homeक्रीडाविश्वब्रेकिंग : क्रीडा क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय, काँग्रेसला दिला...

ब्रेकिंग : क्रीडा क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय, काँग्रेसला दिला झटका

नवी दिल्ली : भारत सरकारच्या वतीने क्रीडा विभागातील उत्कृष्ठ कामगिरीसाठी देण्यात येणारा राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. भारताच्या पुरुष संघाने नुकतंच ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल पटकावलं आहे. त्यातच मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

भारत सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून आता या पुरस्काराला हॉकीचा जादुगार समजल्या जाणाऱ्या आणि देशाला हॉकीमध्ये नावलौकिक मिळवून दिलेल्या मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून याची माहिती दिली आहे.

ऑलिम्पिकमधील दमदार कामगिरीची चर्चा होत असतानाच मोदी सरकारने हा महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे.

मेजर ध्यानचंद यांचं भारतीय हॉकीमध्ये महत्वाचं योगदान राहिलं आहे. त्यांनी त्यांच्या अखेरच्या ऑलम्पिकमध्ये १३ गोल केले होते. त्यांनी बर्लिन येथे १९३६ मध्ये अखेरचं ऑलम्पिक खेळलंय होतं. अमस्टर्डम, लॉस एंजेलिस आणि बर्लिन ऑल्मपिक मिळून ध्यानचंद यांनी ३९ गोल केले होते.

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. २९ ऑगस्टला त्यांची जयंती असते. खेल रत्न पुरस्कारांची सुरुवात १९९१-९२ मध्ये करण्यात आली होती. ध्यानचंद यांनी भारताला सलग तीन ऑलम्पिकमध्ये १९२८ अमस्टर्डम, १९३२ लॉस एंजेलिस आणि १९३६ बर्लिनमध्ये भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय