नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धपरिस्थितीमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. रशिया युक्रेनच्या युद्धाला सुरूवात होऊन आज पाच दिवस लोटले आहेत. रशियाकडून युक्रेनवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने भारतीय नागरिकांना सुरक्षित आणि सुखरुप मायदेशात आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकी पार पडली, या बैठकीत त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाची स्थिती आणि युक्रेन सोडून मायदेशी परतणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा केली.
रशियाच्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठे विमान जळून खाक
त्याचबरोबर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार मोदी सरकारचे चार मंत्री युक्रेनच्या शेजारी युरोपीयन देशांमध्ये जाणार आहे. त्यामध्ये मंत्री हरदीप पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजीजू आणि व्ही. के. सिंह या चार मंत्र्यांचा समावेश आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे रोमानिया आणि मोलदोव्हा, किरने रिजीजू यांच्याकडे स्लोव्हाकिया, हरदीप पुरी यांच्याकडे हंगेरी आणि व्ही. के. सिंह यांच्याकडे पोलंडची जबाबदारी देण्यात आली आहे. हे सर्व मंत्री जबाबदारी दिलेल्या देशांमधील प्रशासनाच्या संपर्कात राहून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य !