पुणे : समलैंगिक (लैंगिक अल्पसंख्याक समुदायांच्या LGBTQI+) हक्कांसाठी पुण्यात रविवारी 10 व्या प्राईड रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्राईड रॅलीची थीम सर्वांना विवाहाचा अधिकार अशी ठेवण्यात आली होती. कोरोनामुळे पडलेल्या दोन वर्षाच्या अंतरानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा हि परेड काढण्यात आली होती.
बिंदु क्युअर राईटस् फांऊडेशन आणि युतक एलजीबीटीक्यूआय सपोर्ट ग्रुपने ही रॅली काढली होती. या रॅलीमध्ये पुणे-मुंबईसोबतच देशभरातील विविध शहरांतून हजारो समलैंगिक आणि तृतीयपंथीय सहभागी झाले होते. ही प्राइड रॅली छत्रपती संभाजी महाराज गार्डनहुन पुढे जंगली महाराज रोड आणि एफसी रोडने पुढे जात फर्गुसन कॉलेजच्या मुख्य गेट समोर जाऊन समाप्त झाली. या मध्ये जवळ जवळ एक हजार लोक सहभागी झाले होते. मासुम, सहेली संग, विदुला सायकॉलॉजी कंसंलट्न्सी, पुणेरी प्राईड फाऊडेशन, एफपीएआय, सम्यक, सीवायडीए या संस्थांनी या प्राईड रॅलीला पाठिंबा दिला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी
विशेष : आंतरजातीय विवाहाचा नाशिक मध्ये गोड शेवट
प्राईड वेळी माजी ACP भानुप्रताप बर्गे, डॉ. कांचन पवार, ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या सोनाली दळवी, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या श्रीमती चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तर समलिंगी विवाह कायद्यास पाठिंबा दिल्याने भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व वंचित बहुजन आघाडीचे बँनरवर सही करून आभार मानण्यात आले.
या प्राईड मध्ये ‘नका करू दुजे पणा तृतियपंथीयांना आपले म्हणा’, ‘आय एम गे दॕटस् ओके’, ‘आता नाही तर मग कधी सिविल युनियन कायदा आणा आधी’, ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं’ अशा घोषणा देण्यात आल्या.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अंतर्गत 100 पदांसाठी भरती, 30000 ते 80000 पगाराची नोकरी