Pratapgad : साताऱ्यातील ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याला राज्य शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या घोषणेमुळे किल्ल्याच्या संवर्धनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. किल्ले प्रतापगड लवकरच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ २०२४ यादीत नामांकनासाठी प्रस्तावित होणार आहे, यासाठी युनेस्को पथक किल्ल्याची भेट देणार आहे.
राज्य शासनाने किल्ल्याला प्राचीन व ऐतिहासिक स्मारक म्हणून संरक्षित घोषित करण्यासाठी दोन महिन्यांचा हरकत कालावधी दिला होता. मात्र, कोणत्याही हरकती न आल्याने प्रतापगडला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
युनेस्कोच्या नामांकनाच्या पूर्वतयारीसाठी सातारा जिल्हा परिषदेतून ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. राज्यातील गड-किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या नामांकनामध्ये होण्यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार तेजस्विनी पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन हे युनेस्कोच्या नामांकन प्रक्रियेच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. सातारा व महाबळेश्वर तालुक्यातील शासनाचे सर्व विभाग यासाठी सक्रिय झाले आहेत.
Pratapgad
हेही वाचा :
पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ
उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ
भयानक : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून अज्ञातांकडून धारदार शस्त्राने युवकाचा खून
धक्कादायक : दुचाकी चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांवर हल्ला; एकाचा मृत्यू
मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश
SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?
आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास
Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरत