मुंबई : उत्तर प्रदेश निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांनी समाजवादी पार्टीला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच संसदेत नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात काँग्रेसने कोरोना वाढवला असल्याचा आरोप केला होता. यावर देखील प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर निशाणा साधला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “पंतप्रधान सभागृहात खोटं बोलले, देशात कोरोना मोदींनी आणला असल्याचे म्हणत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते सभागृहात का बोलत नाही, असा सवालही केला आहे.
आशा व गटप्रवर्तकांचा राज्य सरकारविरोधात एल्गार, १४ फेब्रुवारी ला ‘लाटणे व थाळीनाद मोर्चा’
आगामी उत्तरप्रदेशच्या निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भूमिका जाहीर केली. त्यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाला पाठिंबा देत असल्याचे जाहिर केले. बसपा आणि चंद्रशेखर आझाद हे भाजपला हरवू शकतील अशा स्थिती नसल्यामुळे समाजवादी पक्षाला समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले.
आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, “उत्तरप्रदेश निवडणुकीत भाजप (BJP) आणि आरएसएस (RSS) उभे आहे, त्यांचे लढत थेट समाजवादी पार्टीशी आहे. आणि केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तरप्रदेश मधून जात असल्यामुळे या निवडणुकीत समाजवादी पार्टीला जाहीर पाठिंबा देत आहोत. आंबेडकर जनतेला आम्ही आवाहन करतो की, समाजवादी पार्टीला मदत करा.”
प्रकाश आंबेडकरांचा समाजवादी पार्टीला पाठिंबा, तर मोदी पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलतील…
“केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून विरोधकांचा आवाज दाबत आहेत. २०२४ मध्ये भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलू शकतात”, असा गंभीर आरोप यावेळी केला.
मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी! उद्यापासून काँग्रेसचे ‘माफी मांगो’ आंदोलन