Saturday, April 20, 2024
Homeग्रामीणप्रधानमंत्री आवास योजनेचे अतिरिक्त 2000 घरकुलांचे उद्दिष्ट वाढवून मिळावे व प्रधानमंत्री जन...

प्रधानमंत्री आवास योजनेचे अतिरिक्त 2000 घरकुलांचे उद्दिष्ट वाढवून मिळावे व प्रधानमंत्री जन आरोग्य योजन प्रभावीपणे राबवावी – आमदार राहुल आहेर

चांदवड (सुनिल सोनवणे) : डॉ.भारती पवार यांची नुकतीच केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झाली आहे. यानिमित्ताने त्यांची दिल्ली येथे चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच या भेटी दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्याकडे बुधवार १४ जुलै रोजी निवेदनाद्वारे चांदवड-देवळा मतदारसंघास प्रधानमंत्री आवास योजनेचे अतिरिक्त २००० घरकुलांचे उद्दिष्ट वाढवून मिळावे तसेच नाशिक जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे कामी बैठक आयोजित करावी अशी मागणी केली.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत चांदवड तालुक्यास अनुक्रमे ६५६ (२०१६-१७), २४८ (२०१७-१८), १४५ (२०१८-१९), ५७५ (२०१९-२०), ६७१ (२०२०-२१) व देवळा तालुक्यास ४७४ (२०१६-१७), २३१ (२०१७-१८), १३५ (२०१८-१९), ५७५ (२०१९-२०), ६०९ (२०२०-२१) इतके उद्दिष्ट प्राप्त झालेले आहेत. शासनाच्या आदेशानुसार उर्वरित घरकुल यादी ही प्रपत्र ‘ड’ म्हणून तयार करण्यात आलेली असून यात चांदवड तालुक्यातील १५,६०६ व देवळा तालुक्यातील ९,०४६ लाभार्थ्यांची नोंद केली असून पुढील वर्षी देखील चांदवड व देवळा तालुक्यास उद्दिष्ट प्राप्त झाले तर घरकुले पूर्ण करण्यासाठी १० ते १२ वर्ष लागू शकतात.

सन २०१७-१८ मध्ये प्रपत्र ‘ड’ ऑनलाईन करताना काही ग्रामपंचायत अंतर्गत लाभार्थी नोंदी बाकी राहिलेल्या असल्याने प्रपत्र ‘ड’ मध्ये शिल्लक घरकुल लाभार्थ्यांची नोंद होण्यासाठी ऍप काही दिवसांसाठी पुन्हा सुरु करण्याची मागणी देखील या निवेदनात केली आहे.

नाशिक जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेची (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना) प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून आदेश देण्यात यावेत व आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच पात्र कुटुंबाना ५ लाखापर्यंत मोफत उपचार देण्यात येतात. परंतु सदर योजनेस सुरू होऊन तीन वर्षांचा कालावधी उलटूनही नाशिक जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे देखील या निवेदनात म्हटले आहे.

यासोबतच आयुष्यमान भारत योजना प्रभावीपणे चालण्यासाठी दिल्ली येथे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण गेडाम यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील सदर वेळी उपस्थित होते. तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, डॉ. नितीन गांगुर्डे, चांदवड भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, विजय धाकराव, सुभाष पुरकर, गणेश महाले, योगेश ढोमसे, ऍड. शांताराम भवर, पुंडलिक गुंजाळ, देविदास आहेर, काका काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय