बांधकाम कामगार २ रे राज्य अधिवेशनास सुरुवात |
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार समन्वय समिती (सिटू) चे दुसरे राज्य अधिवेशनाचे थाटात उदघाटन
जालना : भाजप सत्तेत आल्यापासून शेतकरी, कामगार, कष्टकरी पूर्ण नेस्तनाबूत होत आहे. यावरून असे स्पष्ट होते की, आपल्या देशातील सरकार हे सत्ताधारी चालवत नसून येथील भांडवलदार चालवत आहे. त्यामुळे ते कामगार विरोधी धोरणे घेत आहे. अशी टीका कन्स्ट्रक्शन वर्कर फेडरेशन ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ.सुखबीर सिंग यांनी आज (०४) महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार समन्वय समिती (सिटू) चे दुसरे राज्य अधिवेशनाचे उद्घाटनप्रसंगी भाषणात केली.
जालना शहरात पाठक मंगल कार्यलायात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार समन्वय समिती (सिटू) चे दुसरे राज्य अधिवेशन दि.४, ५ जानेवारी रोजी होत आहे.
एम. एच. शेख बांधकाम कामगार अधिवेशनास संबोधित करताना.. |
सरकारने सार्वजनिक उद्योग विक्रीचा सपाटा लावला आहे – कॉ. एम. एच. शेख
कॉ.एम.एच. शेख संघटनेचे राज्य महासचिव बोलताना म्हणाले की सरकार कामगार वर्गाशी दूटप्पी वागत आहे. कोरोना च्या नावाखाली सार्वजनिक उदयोग विक्रीचा सपाटा सरकार ने चालवला आहे. ते जर थांबवायचं असेल तर कामगार कष्टकरी यांची एकजूट मजबूत करुन संघर्ष उभा करणं गरजेचा आहे. कॉ.अण्णा सावंत यांनीही सरकार च्या धोरणावर सडकून टीका केली.
डॉ. सुनंदा तिडके यांनी स्वागताध्यक्ष या नात्याने आलेल्या पाहुण्यांच व राज्यभरातील प्रतिनिधींचे स्वागतपर भाषणातून स्वागत केले.
सिताराम ठोंबरे बांधकाम कामगार अधिवेशनास संबोधित करताना. |
बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर लढा व्यापक करण्याचे अधिवेशन भूमिका बजावले – सिताराम ठोंबरे
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॉ.सीताराम ठोंबरे, यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना म्हणाले की बांधकामगारांच्या प्रश्नावर व्यापक लढा उभा करण्यासाठी हे अधिवेशन महत्वाची भूमिका बाजवेल.
प्रमुख उपस्थिती संघटनेचे कार्याध्यक्ष भरमा कांबळे, सिटू चे कॉ रघु, कॉ.लक्ष्मण सकृडकर, शेतमजूर युनियनचे राज्यध्यक्ष कॉ.मारोती खंदारे, सिटू चे कॉ.दामोदर मानकापे, कॉ.सिंधू शार्दूल, कॉ.गोविंद आर्दड तसेच सुभाष मोहिते, गजानन पातरफळे, दीपक शेळके, अनिल मिसाळ, कल्पना आर्दड, रेणुका तिकांडे, अजित पंडीत, पवन दांडगे, मुबारक पठाण, अमोल काळे आदींची उपस्थिती होती.