Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPimpri Chinchwad : सात वर्षापासून वीज वितरण समस्येचा निवारण नाही

Pimpri Chinchwad : सात वर्षापासून वीज वितरण समस्येचा निवारण नाही

चार-पाच वर्षापासून अनियमित वीज वितरण समस्येचं माहिती देऊनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष (pimpri chinchwad)

Pimpri Chinchwad / क्रांतीकुमार कडुलकर – निगडी येथील यमुनानगर परिसरात गेली सात वर्षभरापासून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असताना बिघाडाबाबतची माहिती सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याची समस्या अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. (pimpri chinchwad)

यमुनानगर हे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विकसित केलेला उच्चभ्रू परिसर आहे. या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था, बँका,हॉस्पिटल्स व शासकीय कार्यालये आहेत शिवाय अनेकांचे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे या भागात वीज पुरवठा असणे आवश्यक आहे.

भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांनी सुद्धा दोन वर्षांपूर्वी विद्युत पुरवठा खंडित होण्याची समस्या वाढल्यानंतर जन आंदोलन केले होते. आमदारानी याबाबत सक्त सूचना केल्यानंतर सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे सध्या ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. मागील चार वर्षापासून दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. दिवसात तसेच रात्रीच्या सुमारास त्रासही नागरिकांना होतो. संपूर्ण यमुना नगर परिसरात वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या अधिक आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास वेळीच बिघाडीची दुरूस्ती होत नाही. त्यामुळे रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाल्यास संपूर्ण रात्र नागरिकांना अंधारातच काढावी लागते.

अनियमित वीज पुरवठा होत असतानाही ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठविले जात आहे.

लॉकडाऊन पासून आधीच सर्व कामधंदे, व्यवसाय ठप्प असतानाही स्थिर आकार, वीज आकार व इतर आकार मिळून अवाढव्य बिल पाठविले जात असल्याने नागरिकांचे महिन्याचे आर्थिक बजेट बिघडत आहे. त्यामुळे यमुनानगरच्या नागरिकांना नियमित विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी गिरीश देशमुख (अध्यक्ष भाजप युवा मोर्चा) यांच्यासह यमुना नगर विद्युत ग्राहकांनी वीज वितरण कंपनीकडे केली आहे.

ऑनलाईन व बँक व्यवहारांवर परिणाम परिसरात मागील दोन वर्षापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शासकीय कार्यालये, बँका तसेच अन्य ऑनलाईन कामे प्रभावित होत आहेत. ऑनलाईन कामे करताना वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर कामावर परिणाम होतो. तसेच बँकेतील अनेक व्यवहार बाधित होतात. अनेकदा लिंक फेल तर कधी टॉवर बंद होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे बँकेत आलेल्या ग्राहकांना आल्यापावली परतावे लागते. नागरी सुविधा केंद्रावर दाखले काढताना अडचणी येतात. ही सर्व समस्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे उद्भवत असतानाही यमुना नगर येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप होत आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 6 ठार, 49 जखमी ; धक्कादायक व्हिडिओ समोर

वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी

लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार 7 हजार रूपये, काय अट आहे वाचा !

पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय