Tuesday, October 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPositive news : भोसरीतील आयुष तेली याच्या प्रसंगावधानतेचे कौतुक!

Positive news : भोसरीतील आयुष तेली याच्या प्रसंगावधानतेचे कौतुक!

मुलीचे अपहरण करणा-या रिक्षा चालकाला दिले पकडून (Positive news)

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केला सन्मान

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भोसरी परिसरात एका मुलीला त्याच्या जबरदस्तीने रिक्षामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहताच स्वदेशा सोसायटीतील आयुष अभिलाष तेली याने प्रसंगावधानता दाखवत प्रतिकार केला. तत्काळ पोलिसांना फोन लावला आणि संबंधित व्यक्तीला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे आयुषच्या धाडसाचे कौतुक होत आहे. (Positive news)

भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी आयुषचा सन्मान करत त्याच्या धाडसी कामगिरीचे कौतुक केले. यावेळी चिखली-मोशी- चऱ्होली पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, निखील बो-हाडे, अनिल हवालदरा, स्वदेशा सोसायटीचे अध्यक्ष निलेश खांडगे, सचिव उमेश कोडक, खजिनदार राजेश मुर्गीकर, कमिटीतील भाऊसाहेब पाटील, राजेश जंगरा, प्रवीण सिंग, निखिल मुटके, संदीप ढोलतोडे, महेश पत्की, केतन अहिनवे उपस्थित होते. (Positive news)

दि. १३ सप्टेंबर रोजी एक व्यक्ती एक मुलीला त्याच्या रिक्षामध्ये जबरदस्तीने टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी घटनास्थळी आयुष उपस्थित होता. त्याने लगेचच परिस्थितीची गंभीरता ओळखली. आयुषने त्या व्यक्तीचा प्रतिकार केला. मुलीला रिक्षामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो त्यात यशस्वी झाला नाही.

त्याने लगेच प्रसंगावधनता 100 क्रमांकावर कॉल करून घटनेची सगळी माहिती पोलिसांना दिली. तत्काळ पोलिसांनी सूत्रे हलविली. थोड्याच वेळात त्या व्यक्तीला पकडण्यात आले. त्यामुळे आयुषच्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया :

आयुष तेली याच्या प्रसंगावधानतेमुळे एका मुलीचा जीव वाचला आहे. त्याच्या धाडसी कामगिरीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आयुषचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. त्याचे या धाडसी कार्यामुळे समाजातील अनेक मुलांना प्रेरणा मिळेल. चुकीच्या घटना रोखण्यासाठी युवा पिढीने पुढे आले पाहिजे. शहरातील माता-भगिनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनासह सूज्ञ नागरीक म्हणून आपलीसुद्धा आहे.

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

संबंधित लेख

लोकप्रिय