नाशिक : राजर्षी शाहू महाराज यांचे, सामाजिक ऐक्य कार्य, राज्यकारभार, घेतलेलेले निर्णय आज ही प्रेरणादायी आहेत. मात्र त्यांचं नाव घेऊन राजकारण करणारे मात्र त्यांचे विचार विसरले आहेत. आज राजकरण अतिशय वाईट पद्धतीने सुरु आहे. हे बदलण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार च लढायला बळ देतील, असे प्रतिपादन छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केले. ते राजश्री शाहू महाराज स्मृती समिती आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी प्रा. उमेश बगाडे, सोमनाथ मुठाल, कॉ. राजू देसले, अँड. प्रकाश काळे, संगिता तिगोटे, जयवंत खडताळे, नाझीम काझी, करण गायकर, प्रभाकर धात्रक, प्रा. डॉ.रामदास भोंग, करूणासागर पगारे, शिवदास म्हसदे उपस्थित होते.
नाशिक जिल्हा मध्ये राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी समिती स्थापन करुन निबंध स्पर्धा, व्याख्यान आयोजित केली याबद्दल अभिनंदन केले. मात्र या प्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्था पदाधिकारी सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित नसल्याबददल खेद व्यक्त केला. विचारांचा जागर केल्याबददल सहभागी सर्व निबंध स्पर्धक चे अभिनंदन केले. राजेंच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या प्रसंगी शाहु महाराज विचार व कार्य या विषयावर बोलताना प्रा. डॉ. उमेश बगाडे म्हणाले, शाहू महाराज हे विसाव्या शतकातील कृतिशील विचारवंत होते. विचारवंत म्हणून त्यांनी वैश्विक राजकीय संकल्पना मांडली. माञ याकडे सर्व सामाजिक विचारवंतांनी, महाविद्यालयातील व विद्यापीठातील विचारवंतांनी दुर्लक्ष केले आहे. लोकशाहीमध्ये सर्व समाजघटकांनचे प्रतिनिधित्व महत्वाचे तत्व म्हणजे लोकशाही दीर्घकाळ टिकते. राजर्षी शाहू महाराजांच्या परिवर्तनवादी विचारांच्या संकल्पनेत व्यापक सामाजिक समतेची उत्स्फूर्त जाणीव होती. या जाणिवेतूनच त्यांनी स्त्री उद्धाराचे कार्य हाती घेतले. स्त्रीदास्याची शृंखला खंडित करायची असेल, तर प्रथम स्त्रीवर्ग शिक्षित झाला पाहिजे, याची जाणीव महात्मा फुल्यांप्रमाणे शाहू महाराजांनाही होती.
राष्ट्रवाद म्हणजे समाजाची नैतिकता आबादित ठेवणे नाहीतर राष्ट्र लवकरच नष्ट होणार. शाहू विचार फक्त बोलण्यासाठी न राहता कृतीत आणावा आज त्याची खूप गरज आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रम चे अध्यक्ष राजू देसले म्हणाले, शाहू विचार पोहचवण्यासाठी या पुढील काळात अधिक विद्यार्थी वर्गासाठी काम 26 जून पासून राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णजयंती महोत्सव वर्ष करू, असे आवाहन उपास्थितांना आवाहन केले.
संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन राजेश म्हसदे, छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वागत अॅड. प्रकाश काळे यांनी तर उमेश बगाडे यांचे स्वागत प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी केले. तसेच करण गायकर यांचे स्वागत गौरव जगताप यांनी केले.
निबंध स्पर्धा परीक्षक समितीचे वतीने डॉ. प्रा. रामदास भोग ह्यांचे मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन प्रा. डॉ. शरद नागरे, चंद्रकांत गायकवाड यांनी केले. आभार प्रभाकर धात्रक यांनी मानले.
हे ही वाचा :
कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत नवीन अपडेट, आता रस्त्यावर लढाई न लढता थेट…
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ३०० गाड्यांच्या ताफ्यासह आख्खं मंत्रिमंडळ महाराष्ट्र दौऱ्यावर
निमगिरी येथे कृषि विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन
विशेष लेख : आधुनिक विचारधारेचा लोकराजा राजश्री शाहू महाराज !
Rainy season : पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे
नोकरीच्या बातम्या वाचा :
शासकिय, निमशासकिय विभागातील विविध पदांसाठी मोठी भरती, वाचा एका क्लिकवर
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदाची भरती, आजच अर्ज करा
NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती
IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत विविध पदांची भरती
BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती