मुंबई : कोरोना काळात जिथं साऱ्या देशानं एकत्र येऊन या संकटावर मात करण्याची अपेक्षा होती, तिथंच भारतात चित्र काहीसं वेगळं असल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते, पक्ष आपलीच पोळी भाजून घेत अनेकदा श्रेय लाटण्यासाठीच जास्त प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. तर कुणाच कुरघोडी करण्याची वृत्ती संताप देऊन जात आहे. जनतेनं जनतेच्याच सेवेसाठी म्हणून निवडून दिलेल्या या नेतेमंडळींच्या भूमिका आणि सध्या सुरु असणारी त्यांची राजकीय खेळी पाहून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत बोचरी पोस्ट लिहिली.
तेजस्विनी पंडित म्हणतात, “सगळ्यात मोठी ‘कीड’ जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे. ती आहे ‘राजकारण’ ही ‘कीड’ कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या ‘कीड’ पासून बचाव करता आला तर बघा! …अवघड आहे सगळंच. काळजी घ्या.”