Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

बाबरी प्रकरणावरून राजकारण तापले, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदे घेत चंद्रकांत पाटलांना दिले प्रत्यूत्तर

मुंबई : बाबरी प्रकरणावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडण्यात बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचा काही संबंध नव्हता असं विधान केलं. चंद्रकांत पाटील यांच्या यावरून राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापताना दिसत आहे. या विधानावरून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांना प्रत्यूत्तर दिले.

---Advertisement---

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे :

– मी अयोध्येला गेलो असताना, राम जन्मभूमीसाठी विशेष कायदा करा, असे म्हटले होते. मात्र मोदींनी ते धाडस केले नाही.

---Advertisement---

– राम मंदिराचा निकाल कोर्टाने दिला आणि हे बिळातंन बाहेर आलेले उंदीर हे त्याचे श्रेय घेण्यास पाहताहेत. एकूणच भारतीय जनता पक्षाची कीव करण्यासारखी गोष्ट आहे.

– लोकांनी विचार करायला हवा. अशा भरकटलेल्या लोकांच्या हाताममध्ये आपला देश, आपलं भविष्य किती दिवस ठेवायचा.

– मिंध्यानी कल्याणमध्ये जे नाटक केलं होत, भाजप शिवसैनिकांवर अन्याय करतो आहे, ते मला बघवलं जात नाहीय. म्हणून मी राजीनामा देतोय. पण भाजप जो बाळासाहेबांचा अपमान करतोय त्यांच्यासोबत तुम्ही किती दिवस त्यांचे तळवे चाटत राहणार आहेत, हे सांगा. नंतर मग त्यांचे नाव आणि फोटो लावा.

– शिवसेना हा पवित्र शब्द उच्चारण्याची तुमची लायकी नाही. ते कोणाला जोडे मारणार आहेत, की स्वतःच स्वतःचे थोबाड फोडणार आहेत.

– भारतीय जनता पक्ष म्हणजे भरकटलेला जनता पक्ष.

– बाबरी पाडल्यानंतर त्याची जबाबदारी न घेता पळून जाणाऱ्या भाजपला उद्देशून त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते, हे कसलं नपुंसक नेतृत्व? घटना घडल्यानंतर पळून जायचं, असं नेतृत्व लाभलं तर या देशात कधी हिंदु उभाच राहणार नाही.

– मोगलांचा इतिहास पुसता पुसता हिंदूंचा इतिहासही पुसायला निघाले की काय? ज्यांच्याकडे शौर्य नसतं त्यांच्यावर ‘चौर्य’ करण्याची वेळ येते.

– बाबरी पाडल्यानंतर सुद्धा ज्या दंगली झाल्या त्यावेळी शिवसेना सत्तेवर नव्हती. पण मुंबई वाचवली ती शिवसेनेने!

– तो लढा होता तो देशद्रोह्यांविरोधी होता. शिवसैनिकांनी दर्ग्याचंही रक्षण केलं आहे.

– बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिंध्याना शोभत नाही.

– भाजप हळू हळू हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे महत्त्व लोकांच्या मनातून पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

– सहन ही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी भारतीय जनता पक्षाची अवस्था झाली आहे.

---Advertisement---

– भाजपचं गोमूत्रधारी हिंदुत्व देशाच्या काही कामाचं नाही.

– हिंदुत्वाच्या बुरख्याआड भाजपचा जो हिडीस चेहरा आहे. तो लोकांच्या समोर येऊ द्या.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles