Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

राजस्थानात राजकीय भूकंप, काँग्रेसच्या 82 आमदारांचे राजीनामे !

जयपूर : राजस्थानातील राजकारणाने आणखी एक अनपेक्षित वळण घेतले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत.त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांची निवड करण्याचा श्रेष्ठींचा विचार आहे. पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध असणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांपैकी ८२ जणांनी आपल्या पदाचे विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे सुपुर्द केले.

यामुळे राजस्थानातील राजकारण ढवळून निघाले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी रविवारी पार पडली. त्यावेळी तिथे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, अजय माकन तसेच माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट हे देखील उपस्थित होते. या बैठकीला काँग्रेसचे अवघे २५ आमदार हजर होते. त्याचवेळी पायलट यांच्या विरोधात वातावरण किती तापलेले आहे याची झलक सर्वांना पाहायला मिळाली.

‘एक व्यक्ती, एक पद’ या तत्त्वाचा आग्रह

एक व्यक्ती, एक पद या तत्त्वासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेस नेते राहुल गांधी आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची असल्यास अशोक गेहलोत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडले पाहिजे असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह आहे. मात्र ते अशोक गेहलोत व त्यांच्या समर्थक आमदारांना मान्य नाही.

आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता

राजस्थानमध्ये काँग्रेसचे १०८ आमदार असून त्यातील बहुतांश आमदारांचे अशोक गेहलोत यांना समर्थन असल्याचे रविवारच्या घडामोडींतून दिसून आले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीच्या आधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांपैकी काही जण विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या निवासस्थानी गेले व त्यांना आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर ८२ आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. राजस्थानचे मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. राजीनामे देणाऱ्या आमदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles