Thursday, December 12, 2024
Homeराजकारणमहाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ...

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ !

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra Politics) विविध राजकीय घडामोडी घडत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे.

दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, किरण लहमाटे, सरोज अहिरे, अशोक पवार, अनिल पाटील, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, दौलत दरोडा, अनुल बेणके, रामराजे निंबाळकर, धनंजय मुंडे, निलेश लंके, मकरंद पाटील, आणि यासोबत तीस आमदार राष्ट्रवादी सोडण्याच्या वाटेवर आहेत.


संबंधित लेख

लोकप्रिय