Saturday, March 15, 2025

त्र्यंबकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांवर पोलीस कारवाई; महादेवाच्या पिंडीवर भामट्या पुजाऱ्यांनी….

गेल्या वर्षी ३० जून २०२२ रोजी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मंत्र आता या व्हायरल व्हिडिओ बाबत पोलिसांनी नवा खुलासा केला आहे.

नाशिक पोलिसांना तपासादरम्यान एका पुजार्‍याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने बर्फ एका पिशवीत भरून पिंडीवर ठेवल्याचे समोर आले आहे. पुजाऱ्यांनी केलेला बनाव असल्याचे चौकशी समितीत उघड झाले आहे. तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पुजाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, शिवपिंडीत बाबा अमरनाथ सदृश बर्फाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेचा विषय बनला होता. देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने हवामान खात्याची मदत घेऊन योग्य स्थितीची पडताळणी केली. यानंतर चौकशी समितीही नेमण्यात आली होती. यानंतर समितीने त्र्यंबकेश्वर मंदिरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक घटना समोर आली. समितीच्या अहवालानंतर तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रश्‍वी आश्रम यांनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुजारी सुशांतने स्वतः बर्फ एका पिशवीत भरून पिंडीवर ठेवला आणि त्यावर बेल पत्र टाकले आणि त्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याची माहिती समोर आली आहे.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. लाखो भाविक या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. इथल्या शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत. ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या शंकराच्या पिंडीवर बर्फाचे थर जमा झाल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. याचा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आला होता. मात्र हा पिंडीवर बर्फ जमा झाल्याची घटना निव्वळ बनाव असल्याचे उघड झाले आहे

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles