Friday, April 19, 2024
Homeग्रामीण'पीएमआरडीए' कडून विकास कामांसाठी ८१७.५ लाख रुपयांचा निधी मंजूर - डॉ.अमोल कोल्हे

‘पीएमआरडीए’ कडून विकास कामांसाठी ८१७.५ लाख रुपयांचा निधी मंजूर – डॉ.अमोल कोल्हे

शिरूर / रवींद्र कोल्हे : शिरूर लोकसभा मतदार संघात वर्षानुवर्षे रखडलेल्या खेड, शिरूर आणि हवेली तालुक्यातील रस्त्यांचे कामे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सुचविलेल्या रुपये ८१७.५ लाख रकमेच्या विविध रस्त्यांच्या कामांना पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण ने सन २०२१ – २२ च्या आराखड्यांतर्गत मंजुरी दिली असल्याची दिली.

कोरोना महामारी कालावधीत केंद्र सरकारने नव्या संसदभवनाचे काम हाती घेतल्याने आणि त्याचप्रमाणे कोरोना महामारीशी सामना करण्याचं कारण पुढे करून केंद्र सरकारने सन २०२०-२१ व २०२१-२२ खासदारांचे असे दोन वर्षांचा १० कोटी निधी अक्षरशः रोखला. मात्र असं असलं तरी अन्य निधीतून तसेच अन्य योजनेतून भरघोस निधी आणण्यात खासदार डॉ.अमोल कोल्हे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे मतदार संघातील कामांचा सपाटा त्यांनी लावला आहे.

पीएमआरडीए च्या सन २०२१ – २०२२ या आराखड्यांतर्गत शिरूर तालुक्यातील मौजे निमगाव भोगी ते सोनेसांगवी जिल्हा मार्ग १४६) या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी( रुपये १०१.०० लाख), मौजे गणेगाव शिवारातील वरुडे चिंचोशी कान्हूरमेसाई इजिमा १४२)रस्त्याचे बांधकाम करणे(रुपये १३५.०० लाख), हवेली तालुक्यातील नायगाव थेऊर शिवरस्ता करणे (रुपये २८१.५० लाख), खेड तालुक्यातील मौजे सुतारवाडी अंतर्गत प्रतिमा १७ ते सुतारवाडी रस्ता सुधारणा करणे (रुपये ७५.०० लाख) वाफगाव ते मांदळेवाडी (ग्रा.मा.७१)रस्ता करणे(रुपये ७५.००लाख), आणि मौजे तोरणे येथील तोरणे पराळे जोडरस्ता (शिवरस्ता) करणे (रुपये ७५.०० ) आदी रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आहे. 

त्याचप्रमाणे यापूर्वी कोरेगाव भीमा ते वढू बु. प्रजिमा १९ या ३.२५० कि.मी.लांबीच्या रस्त्यांपैकी किमी ००/००ते किमी ९५०/०० लांबीचे १० मीटर रुंदीकरणासाठी व काँक्रीटीकरणासाठी साडेसहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय