Tuesday, December 17, 2024
Homeताज्या बातम्याPMAY : पीएम आवास योजनेच्या तब्बल 'इतक्या' लाख घरांना मंजुरी, कामगार तसेच...

PMAY : पीएम आवास योजनेच्या तब्बल ‘इतक्या’ लाख घरांना मंजुरी, कामगार तसेच महिलांसाठी विशेष योजना

नवी दिल्ली / वर्षा चव्हाण – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशातील लाखो लोकांना हक्काचे घर मिळाले आहे. आता या योजनेच्या मर्यादा वाढवण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. (PMAY)

शहरातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना हक्काचं घर मिळावं यासाठी पीएम आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारने पहिला टप्प्यात सहा लाख घर बांधण्यासाठी मान्यता दिली आहे.

या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच वर्षात विविध शहरांमध्ये सुमारे एक कोटी घर उभी राहणार आहेत. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी MOU वर स्वाक्षरी केली आहे. (PMAY)

सहा लाख घर बांधण्याबरोबरच केंद्र सरकार भाडेतत्त्वावरील घरांवरही लक्ष केंद्रित करत आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे आणि उत्पन्न अत्यल्प आहे, अशांसाठी भाड्याने घर मिळणार आहेत. आणि यामध्ये कामगार तसेच महिलांकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधून दिले जाते किंवा आर्थिक मदत केली जाते. PMAY अंतर्गत आता घरासोबतच शौचालय, वीज, एलपीजी कनेक्शन, नळजोडणी अशा सगळ्या सुविधा दिल्या जाणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान आवास योजना नेमकी काय आहे? या योजनेत कशाप्रकारे लाभ मिळतो? त्यासाठी काय कागदपत्रे लागतात हे जाणून घेऊ या…

🟣पीएम आवास योजना काय आहे?

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लोकांना घर बांधून दिले जाते. त्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपये दिले जातात. देशातील गरीब लोकांना हक्काचे घर मिळावे म्हणून ही योजना चालू करण्यात आली होती. आता या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. गरिबांपासून ते मध्यमवर्गापर्यंतच्या नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी आता या योजनेतून निधी दिला जातो. हा लाभ मिळावा यासाठी उत्पन्नाच्या आधारावर या योजनेत अनेक गट पाडण्यात आलेले आहेत. या गटानुसार घरासाठी कर्ज दिले जाते. अगोदर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम 3 ते 6 लाख रुपये होती. या कर्जावर अनुदानही मिळायचे. आता या कर्जाची मर्यादा 18 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.

त्यासाठी पीएम आवास योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या उत्पन्न गटात येता, हे अगदोर ठरवा.

त्यानंतर http://pmaymis.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.


कोणकोणत्या कागदपत्रांची गरज

पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे काही कागदपत्रं असणं गरजेचं आहे. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. यासह तुमच्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे आहे. यामध्ये फॉर्म क्रमांक 16, बँक खात्याचे स्टेटमेंट, आयटी रिटर्न्स तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय